शहरं
Join us  
Trending Stories
1
चौदा गावांचा भुर्दंड कदापि सहन करणार नाही, शिंदेंच्या निर्णयाला गणेश नाईकांचा विरोध कायम
2
वक्फबाबत सुप्रीम कोर्टाचे अंतरिम आदेश; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
'विशाल गवळीच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करा', आई इंदिरा गवळीची याचिका दाखल करणार
4
Cidco Lottery 2025: अक्षय तृतीयेला सिडको आणणार १२ हजार घरे?
5
आता दुकानदारांनाही मिळणार पेन्शन? योजना या वर्ष अखेरीस सुरू होण्याची शक्यता
6
मुंबईचा फलंदाज बाद झाला, माघारी परतत असतानाच तिसऱ्या पंचांना दिसली यष्टीरक्षकाची घोडचूक, मग...
7
ठाणे: पट्टे, रॉड अन् बांबूने लहानग्यांना मारहाण, बालआश्रमातील वास्तव; ४ मुलींवर झाले अत्याचार
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२५: धन व कीर्ती यांची हानी संभवते
9
'टी. एन. शेषन यांनी मागितले होते गृहमंत्रिपद', माजी राज्यपालांच्या पुस्तकात खळबळजनक दावा
10
ठाण्यातील १,३०० झाडांवर कुऱ्हाड चालविण्याचा विकासकाचा ‘डाव’, वृक्षांचे वय लपवल्याचे वनविभागाच्या पाहणीत उघड
11
"इंडस्ट्रीतील प्रत्येक महिलेसोबत त्याचे शरीरसंबंध...", अमृता रावची बहीण प्रीतिकाचे टीव्ही अभिनेत्यावर गंभीर आरोप
12
समृद्धी महामार्गावरून मेपासून जा सुसाट; मुंबई ते नागपूर केवळ आठ तासांचा प्रवास
13
मध्य रेल्वेवर रविवारी खोळंबा, सीएसएमटी-विद्याविहारदरम्यान पाच तासांचा मेगाब्लॉक
14
विशेष लेख : बाळासाहेब ठाकरे नाशिकहून ‘लाइव्ह’..., आपल्या नेत्यांचे विचारच बदलायचे?
15
मुंबईतील ३६ विधानसभांसाठी भाजपचे १०८ मंडल अध्यक्ष, कोअर कमिटीच्या बैठकीत आज होणार शिक्कामोर्तब
16
वक्फ मालमत्तांचा दर्जा ५ मेपर्यंत रद्द होणार नाही; केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयाला हमी
17
अग्रलेख: तुही भाषा कंची? अशी सक्ती करायचे कारण नाही
18
शेअर बाजाराचा चौकार, ६.३७ टक्क्यांनी वाढला सेन्सेक्स; सलग चौथ्या दिवशी बाजारात वाढ
19
चार मुलींचा स्कूल बसमध्ये लैंगिक छळ, स्कूल बसच्या क्लिनरविरोधात गुन्हा दाखल
20
"न्यायालये राष्ट्रपतींना कालमर्यादा आखून देऊ शकत नाहीत; ‘सुपर पार्लमेंट’सारखे वागू नये"

कॉफी उत्पादित करणारे चिखलदरा एकमेव हिल स्टेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 05:01 IST

इंग्रज अधिकारी जेम्स मुल्हेरन याने चिखलदऱ्यात सर्वप्रथम कॉफी रोपांची लागवड केली. केरळमधून आणलेल्या कॉफी रोपांची त्याने चिखलदरा येथील आपल्या मुल्हेरन कॉटेज नामक बंगल्याच्या आवारात १८६० ते १८६१ दरम्यान लागवड केली आणि चिखलदऱ्यात कॉफी रुजली. १८९७-९८ दरम्यान रोमन कॅथोलिक मिशनची सुरुवात करणाऱ्या फादर थेवनेट यांनी रोजगार व उदरनिर्वाहाचे साधन म्हणून कॉफीचा विचार केला आणि १९१०पर्यंत येथे कॉफीचे मळे विकसित केले.

ठळक मुद्देचहाच्या मळ्याचीही नोंद, इंग्रज अदमानीत झाले विकसित

अनिल कडूलोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : कॉफी उत्पादित करणारे चिखलदरा हे राज्यातील एकमेव हिल स्टेशन ठरले आहे. इंग्रजांनी चिखलदरा येथे चहाचे मळे विकसित करून चहाचे उत्पादनही घेतले आहे.इंग्रज अधिकारी ए. ई. नेल्सन व बॅचलर अर्नेस्ट यांच्या नोंदीनुसार, चिखलदऱ्यात त्याकाळी चहा आणि कॉफीचे मोठ्या प्रमाणात खासगी मळे होते. चहा व कॉफीच्या लागवडीकरिता असलेला वाव बघून अनेक युरोपियन बागायतदारांना चिखलदऱ्याकडे आकर्षित केले होते. त्या बागायतदारांनी चहा व कॉफीचे मळे या ठिकाणी फुलविले. कालांतराने हे चहाचे मळे संपुष्टात आले. मात्र रोमन कॅथोलिक मिशनरीकडील जमिनीवर कॉफीचे खासगी मळे टिकून आहेत.इंग्रज अधिकारी जेम्स मुल्हेरन याने चिखलदऱ्यात सर्वप्रथम कॉफी रोपांची लागवड केली. केरळमधून आणलेल्या कॉफी रोपांची त्याने चिखलदरा येथील आपल्या मुल्हेरन कॉटेज नामक बंगल्याच्या आवारात १८६० ते १८६१ दरम्यान लागवड केली आणि चिखलदऱ्यात कॉफी रुजली. १८९७-९८ दरम्यान रोमन कॅथोलिक मिशनची सुरुवात करणाऱ्या फादर थेवनेट यांनी रोजगार व उदरनिर्वाहाचे साधन म्हणून कॉफीचा विचार केला आणि १९१०पर्यंत येथे कॉफीचे मळे विकसित केले. मरियमपूर परिसरात जवळपास १०० एकरात कॉफी लागवड केली गेली. इंग्रजांच्या नोंदीनुसार, चिखलदरा येथे ९७.२०० हेक्टर म्हणजेच २४० एकरात कॉफीची लागवड होती. आज मात्र केवळ १७ हेक्‍टर क्षेत्रावरच कॉफी लागवड आहे. चिखलदरा गार्डन, वनविभागाचे बंगले आणि विश्राम गृह परिसरासह मरियमपूर भागात कॉफी वृक्ष बघायला मिळतात. चिखलदऱ्यातील कॉफी त्याकाळी ट्रकद्वारे मद्रास येथील पोलसन कंपनीकडे पाठविली जायची. १९६५ पर्यंत कॉफीचे ट्रक चिखलदऱ्यातून रवाना केले जात होते.  

अरेबिका कॉफीची लागवड सोयीचीकर्नाटक कॉफी बोर्डाचे संशोधन उपसंचालक ए.जी. सांबामूर्ती रेड्डी आणि केरळ कॉफी बोर्डाचे संशोधन उपसंचालक डॉ. टी राजू यांनी २४ व २५ डिसेंबर १९९६ ला चिखलदरा येथे येऊन चिखलदरा कॉफीचा अभ्यास केला. चिखलदरा येथे अरेबिका कॉफीची लागवड सोयीची असल्याचा त्यांचा अभिप्राय आहे.

अप्पर प्लॅटोवर १०० हेक्टर क्षेत्र आरक्षितसमुद्रसपाटीपासून ३६६४ फूट उंचीवर असलेले चिखलदरा हे अप्पर प्लॅटो आणि लोअर प्लॅटो अशा दोन भागात विभागले आहे. या दोन प्लॅटो मधील उंचीतील अंतर ८० फूट आहे. चिखलदरा येथील कॉफीचे वृक्ष अप्पर प्लॅटोवर बघायला मिळतात. कॉफीकरिता अप्पर प्लॅटोवरचे नैसर्गिक वातावरण पोषक ठरले आहे. सिडकोने सादर केलेल्या आणि अंशतः मंजूर असलेल्या विकास आराखड्यात कॉफी करिता अप्पर प्लॅटोवर १०० हेक्टर क्षेत्र आरक्षित आहे. 

 

टॅग्स :Chikhaldaraचिखलदरा