लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बालपण घालवलेल्या विदर्भाचे नंदनवन चिखलदरा असून, यंदा नगरपरिषद निवडणुकीत पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ आल्हाद कलोती हे रिंगणात आहेत. आल्हाद यांनी नामांकन दाखल केल्याने नगरपरिषद निवडणुकीकडे अनेकांचा नजरा लागल्या आहेत.
चिखलदरा विकासासाठी आल्हाद यांची उमेदवारी असल्याचा विश्वास भाजपच्या नेत्या तथा माजी खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांनी व्यक्त केला आहे. चिखलदऱ्याच्या विकासाचे चित्र बदलणार असून स्काय वॉक, पर्यटन विकास, रस्ते सुविधा, पिण्याच्या पाण्याचे प्रकल्प व विद्युत प्रकल्प यासारखे मोठमोठे प्रकल्प मार्गी लागणार आहे, असा विश्वास राणा दाम्पत्याने व्यक्त केला आहे.
निवडणुकीकडे लक्ष
आल्हाद कलोती यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर चिखलदऱ्याच्या विकासाला प्राधान्य दिले जाईल. ही बाब त्यांनी स्पष्ट केली. चिखलदरा पर्यटनस्थळाचे रखडलेले विविध प्रकल्प, पाणी पुरवठा समस्या, रस्ते विकास यासह नागरिकांच्या मुलभूत सुविधा पुरविण्यचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे.
आल्हाद कलोती यांची उमेदवारी दाखल करतेवेळी अमरावती जिल्हा निवडणूक प्रभारी आ. संजय कुटे, मेळघाटचे निवडणूक निरीक्षक तथा माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील, खासदार डॉ. अनिल बोंडे, माजी खा. नवनीत राणा, आ. केवलराम काळे, प्रभुदास भिलावेकर, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोमवंशी, राजेश मांगलेकर, अन्वर हुसेन, वेदांत सुरपाटणे, गुरू ठाकूर सोमवंशी, जितू पचोरी, तिलक मिश्रा, सूरज तिवारी, पंकज पचोरी, अनुप सोमवंशी, अरुण तायडे, शेख भिक्कम, अमोल हाते, प्रमोद शनवारे, राम हेगडे, रामेश्वर निखाडओ आदी उपस्थित होते.
Web Summary : Alhad Kaloti, Chief Minister Fadnavis's cousin, is contesting Chikhaldara's municipal elections. Leaders express confidence his candidacy will boost tourism, infrastructure, and basic amenities in the region. Focus is on pending projects and citizen's needs.
Web Summary : मुख्यमंत्री फडणवीस के चचेरे भाई, आल्हाद कलोती, चिखलदरा नगर पालिका चुनाव लड़ रहे हैं। नेताओं का मानना है कि उनकी उम्मीदवारी से पर्यटन, बुनियादी ढांचे और क्षेत्र में बुनियादी सुविधाओं को बढ़ावा मिलेगा। लंबित परियोजनाओं और नागरिकों की जरूरतों पर ध्यान केंद्रित है।