शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांनी मागविली फाईल

By admin | Updated: November 22, 2015 00:07 IST

श्रीमंत दादासाहेब खापर्डे यांच्या राजकमल चौकातील ऐतिहासिक खापर्डे वाड्याच्या प्रकरणाची फाईल स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागवली ....

खापर्डे वाडा : मनपा आयुक्तांना आदेशअमरावती : श्रीमंत दादासाहेब खापर्डे यांच्या राजकमल चौकातील ऐतिहासिक खापर्डे वाड्याच्या प्रकरणाची फाईल स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागवली असून तसे पत्र नगर विकास मंत्रालयाचे आयुक्तांना प्राप्त झाले आहे. महानगर पालिकेने ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यासाठी वाड्याची जमीन संपादित करण्यासंदर्भात आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना मंत्रालयाच्यावतीने पत्र पाठवून आदेशित करण्यात आले आहे. खापर्डे वाड्याच्या प्रकरणाची फाईल दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांकडे पाठवावे, असे त्यात पत्रात नमूद आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील अनेक चळवळी याच खापर्डे वाड्यातून लढल्या गेल्याचा इतिहास आहे. तसेच अनेक संतानी येथे भेटी दिल्या आहे. पुणे येथील शनिवार वाड्याप्रमाणेच खापर्डे वाडा हा अंबानगरीचे वैभव आहे. तसेच येथे शेगावीचा योगी श्री संत गजानन महाराजांनी भेट दिली होती. हा सगळा इतिहास पाहता आ. रवि राणा यांनी गृहराज्यमंत्री रणजित पाटील व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या ऐतिहासिक वाड्याचे जतन करण्यासाठी मनपाने ही जागा संपादित करावी या संदर्भाचे ९ नोव्हेंबर रोजी पत्र दिले होते. त्यामुळे खुद मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घातले असून आयुक्तांना या प्रकरणाची फाईल त्वरित पाठविण्याचे आदेश दिले आहे. या प्रकरणाचा सर्वप्रथम ‘लोकमत’ने पाठपुरावा केला होता. खापर्डे वाड्याचे ऐतिहासिक महत्त्व लोकदरबारात मांडले होते. त्यामुळे हे मोठे यश मानल्या जात आहे. (प्रतिनिधी)