शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

चांदूर रेल्वे नगर परिशद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:32 IST

जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये स्थायी समितीच्या व विषय समितीच्या निवडणुकीसाठी विशेष सभा शुक्रवारी दुपारी १२ वाजता स्थानिक नगर परिषद सभागृहात ...

जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये स्थायी समितीच्या व विषय समितीच्या निवडणुकीसाठी विशेष सभा शुक्रवारी दुपारी १२ वाजता स्थानिक नगर परिषद सभागृहात पार पडली. यावेळी पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली सदर सभा सुरू करण्यात आली होती. या सभेला निवडून आलेले १६ व नामनिर्देशित २ न. प. सदस्य उपस्थित होते. या विशेष सभेमध्ये सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतिपदी शुभांगी वानरे यांची निवड करण्यात आले. यांना सूचक प्रवण भेंडे व अनुमोदक स्वाती माकोडे ह्या होत्या. तर पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी गोटु उर्फ वैभव गायकवाड यांची वर्णी लागली. यांना सूचक स्वाती माकोडे व अनुमोदक सतपाल वरठे होते. याशिवाय महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदावर कल्पना लांजेवार यांची निवड करण्यात आली. यांना सूचक शबाना परवीन अ. हमीद कुरेशी व अनुमोदक शारदा मेश्राम ह्या होत्या. तसेच या समितीच्या उपसभापतिपदी शारदा मेश्राम यांची वर्णी लागली. तर स्वच्छता वैद्यक सार्वजनिक आरोग्य व शिक्षण समितीच्या सभापती पदावर महेश कलावटे यांची निवड करण्यात आली. यांना सूचक सतपाल वरठे व अनुमोदक प्रवण भेंडे होते. तर स्थायी समिती मध्ये एकूण ६ सदस्य असून त्यात अध्यक्ष शिट्टू सुर्यवंशी हे स्थायी समितीचे पदसिद्ध सभापती असुन आणि उपाध्यक्ष देवानंद खुणे हे नियोजन व विकास समितीचे पदसिद्ध सभापती आहेत. यामध्ये सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉ. मेघना वासनकर यांनी काम पाहिले. या सभेला नगराध्यक्ष शिट्टू सूर्यवंशी, उपाध्यक्ष देवानंद खुणे व सर्व नगर परिषदेचे सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.