शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

‘केम’ पुढे ४० दिवसांत ३२.४० कोटी खर्चाचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 12:59 PM

पश्र्चिम विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांसाठी सुरू असलेल्या समन्वयीत कृषी विकास प्रकल्पाला (केम) ४० दिवसांत ३२.४० कोटी रूपये खर्च करण्याची किमया करावी लागणार आहे.

ठळक मुद्देप्रकल्पास मुदतवाढपश्र्चिम विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रगस्त सहा जिल्ह्यांसाठी निधी

गणेश वासनिक।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पश्र्चिम विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांसाठी सुरू असलेल्या समन्वयीत कृषी विकास प्रकल्पाला (केम) ४० दिवसांत ३२.४० कोटी रूपये खर्च करण्याची किमया करावी लागणार आहे. मात्र, आतापर्यंत ‘केम’ला केंद्र व राज्य शासनासकडून हजारो कोटींचे अनुदान प्राप्त झाले असून खरेच शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला का, हा संशोधनाचा विषय ठरत आहे.‘कृषिसमृद्धी’ समन्वयीत कृषी विकास प्रकल्पाची मुहूर्तमेढ १३ आॅगस्ट २००९ रोजी करण्यात आली. पश्र्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, बुलडाणा, वर्धा, यवतमाळ आणि वाशिम या सहा जिल्ह्यांमध्ये शासनामार्फत आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी (आयएफएडी) व सर रतन टाटा ट्रस्ट (एसआरटीटी) यांच्या वित्तीय सहयोगाने हा प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पाचा कालावधी ३१ डिसेंबर २०१७ रोजी संपुष्टात येणार होता. मात्र, या प्रकल्पास ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. यानंतर प्रकल्पात कोणत्याही कामकाजाच्या खर्चाची प्रतिपूर्ती आयएफएडीकडून करण्यात येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. परंतु,‘केम’ प्रकल्पांतर्गत प्रकल्पाकडील उर्वरित कामे पूर्ण करण्याकरिता, प्रकल्प समाप्तीबाबत व प्रकल्पाचे मूल्यांकनासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सेवा ३१ मार्च २०१९ च्या पुढे सुरू ठेवण्यास तसेच प्रकल्पाकडील सन २०१८-२०१९ या आर्थिक वर्षातील वितरित निधीपैकी ३२.४० कोटी एवढी रक्कम ३१ मार्च २०१९ पर्यंत खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे. हा निर्णय १६ फेब्रुवारी २०१९ रोजी शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने घेतला आहे. यापूर्वी ‘केम’मध्ये मोठ्या प्रमाणात निधीचा ‘गेम’ झाल्याच्या पार्श्वभूमिवर चौकशी सुरू आहे. अशातच आता ४० दिवसांत ३२.४० कोटी रूपये शेतकऱ्यांच्या विविध योजनांवर खर्च होणार असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. कमी कालावधी असताना ई-निविदा, खरेदी प्रक्रिया तसेच शेतकरी लाभार्थी, महिला बचत गट, कृषी क्षेत्राशी निगडित योजना राबविणे ‘चॅलेंजिंग’ ठरणारे आहे.हे आहेत प्रकल्पाचे मुख्य उद्देशघटलेले कृषी उत्पन्न वाढविण्याच्या प्रयत्नात योगदान देणे, प्रकल्प क्षेत्रातील कुटुंबांचा शाश्वत व वैविध्यपूर्ण उत्पन्नांच्या स्त्रोतांसह कृषी व कृषिकेतर उत्पन्नांचा साधनाद्वारे विकास करणे, उत्पादनातील व बाजारपेठीय जोखिमींमुळे दारिद्र्य व नैराश्याच्या परिस्थितीत न जाता कुटुंबांना सुस्थितीत पुनर्स्थापित करणे.अशी आहे प्रकल्पाची व्याप्तीएकूण जिल्हे - ६एकूण तालुके - ६४एकूण समूह - (२० ते २५ गावे) ६४एकूण गावे- १६०६कुटुंब संख्या- २, ८६, ८००

टॅग्स :Farmerशेतकरी