शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

स्पिडगनच्या उपयोगितेचे पोलिसांसमोर आव्हान

By admin | Updated: December 15, 2015 00:17 IST

वाहनांच्या वेगावर अंकुश लावण्याच्या दृष्टीने पोलीस विभागाने स्पिडगन शहरात आणल्या.

वेगमर्यादा दर्शक बोर्डांचा अभाव : वाहनांच्या वेगावर अंकुश बसविण्याचे प्रयत्न अमरावती : वाहनांच्या वेगावर अंकुश लावण्याच्या दृष्टीने पोलीस विभागाने स्पिडगन शहरात आणल्या. त्याच्या वापरासाठी आता पोलिसांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. मात्र, शहरात वाहनांची गती मोजण्यासाठी थेट मार्ग नाहीत. तसेच अद्यापपर्यंत बहुतांश मार्गांवर वेगमर्यादा दर्शविणारे बोर्ड नसल्यामुळे स्पिडगनचा उपयोग होणार तरी कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील बहुतांश मार्ग ५० ते १०० मीटरच्या आतील असून त्यानंतर वळण मार्ग आहेत. स्पिडगनचा वापर करताना संबंधित पोलीस कर्मचारी वेगवान वाहनावर लक्ष्य साधून वेगाचे मोजमाप करणार आहे. शहरात वेगवान वाहने दररोज चालतात. मात्र, ते वाहन १०० मीटर अंतरादरम्यानच वळण घेतात. त्यामुळे स्पिडगनचा वापर करताना वाहनाकडे लक्ष्य साधणे हे एक मोठे आव्हान पोलीस विभागासमोर निर्माण होणार आहे. एखादे वाहन १ किलोमिटरपर्यंत वेगाने चालत असेल तरच स्पिडगनद्वारे वाहनाकडे लक्ष्य वेधणे शक्य होऊ शकते. तेव्हाच वाहनाचा वेग व वाहन क्रमांकाचे छायाचित्र काढले जाऊ शकते. जर ते वाहन ५० मीटरच्या आतच वळण घेत असेल तर काही क्षणात त्या वाहनाकडे लक्ष्य साधले गेले पाहिजे. तेव्हाच स्पिडगन पोलीस विभागासाठी उपयोगी ठरणार आहे. शहरात अमरावती-बडनेरा, पंचवटी-पॉवर हाऊस व एमआयडीसी बायपास मार्ग हे तीनच मुख्य आणि थेट मार्ग आहेत. या मार्गाची लांबी सरळ दिशेने असल्यामुळे याच मार्गावर स्पिडगनचा उपयोग होऊ शकतो, असे दिसून येत आहे. त्यामुळे शहरातील अंतर्गत मार्गांवर वाहनांच्या वेगाचे मोजमाप करणे व त्या वाहनांवर कारवाई करणे हे पोलीस विभागासमोर आव्हानच ठरणारे आहे. (प्रतिनिधी)शहरातील अंतर्गत मार्गावर अनेक ठिकाणी वळणे आहेत. त्यामुळे स्पिडगनद्वारे 'टार्गेट' शोधणे कठीणच होणार आहे. स्पिडगनचा उपयोग सरळ दिशेने जाणाऱ्या मार्गावर होऊ शकतो. स्पिडगनच्या वापरासाठी मार्गदेखील निश्चित करावे लागणार आहेत. सद्यस्थितीत पोलिसांचा सराव सुरू आहे. - नीलिमा आरज, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा.