रेती वाहतूकदारांचा चक्काजाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 05:00 AM2020-09-29T05:00:00+5:302020-09-29T05:00:29+5:30

मध्य प्रदेशातून रॉयल्टी देऊन महाराष्ट्रात रेतीची डंपरद्वारे वाहतूक केली जात आहे. या व्यवसायात हजारो लोकांच्या हाताला काम मिळाले. परंतु, ओव्हरलोड रेती वाहतूक करणाºयांवर महसूल आणि पोलीस प्रशासनाने कारवाईचा धडाका लावत वरूड आणि मोर्शी तालुक्यात रेती वाहतूक बंद केली. हा अन्याय वरूड-मोर्शीतच का, असा सवाल रेती वाहतूकदारांचा आहे.

Chakkajam of sand transporters | रेती वाहतूकदारांचा चक्काजाम

रेती वाहतूकदारांचा चक्काजाम

Next
ठळक मुद्देवरूडात ६५ डंपर रस्त्यावर : महसूल, पोलिसांच्या अरेरावीचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्क
वरूड : पोलीस आणि महसूल प्रशासन यांच्याकडून मध्यप्रदेशातून होणाऱ्या रेती वाहतुकीच्या ओव्हरलोड डंपरवर कारवाई रोख असल्याने रेती वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याचा आरोप करून रेती वाहतूकदार संघटना आणि वीर शहीद भगतसिंग सेनेच्यावतीने सोमवारी सकाळी ११ वाजता स्थानिक पांढुर्णा चौकात चक्कजाम आंदोलन केले. यावेळी तब्बल ६५ डंपर रस्त्यावर एका रांगेत लावण्यात आले. बैठ्या संत्याग्रहामुळे एक तास वाहतूक खोळंबली. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. पोलिसांनी १८ कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे नोंदवून अटक आणि सुटका केली.
मध्य प्रदेशातून रॉयल्टी देऊन महाराष्ट्रात रेतीची डंपरद्वारे वाहतूक केली जात आहे. या व्यवसायात हजारो लोकांच्या हाताला काम मिळाले. परंतु, ओव्हरलोड रेती वाहतूक करणाºयांवर महसूल आणि पोलीस प्रशासनाने कारवाईचा धडाका लावत वरूड आणि मोर्शी तालुक्यात रेती वाहतूक बंद केली. हा अन्याय वरूड-मोर्शीतच का, असा सवाल रेती वाहतूकदारांचा आहे. प्रशासनाच्या धडक कारवाईने त्रस्त झालेल्या रेती वाहतूकदार संघटना आणि वीर शहीद भगतसिंग सेनेने अखेर स्थानिक पांढुर्णा चौकात ६५ डंपर रस्त्यावर उभे करून बैठे आंदोलन करण्यात आले. यावेळी रेती वाहतूकदार संघटनेच्या पदाधिकाºयांनी उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फडतरे, तहसीलदार सुनील सावंत, ठाणेदार मगन मेहते यांच्यापुढे मागण्या मांडल्या. यावेळी आमदार देवेंद्र भुयार, पंचायत समितीचे सभापती विक्रम ठाकरे, वीर भगतसिंग सेनेचे अध्यक्ष जयंत कोहळे, रवि पुरी आदींनी रेती वाहतूकदारांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली. पोलिसांनी १८ जणांना ताब्यात घेतले. गुन्हे नोंदवून सुटका करण्यात आली.

अटी-शर्तीवरच वाहतुकीला परवानगी
आंदोलन चिघळू नये, यासाठी रेती वाहतूकदारांशी तहसीलदार सुनील सावंत यांनी बोलणी केली. शासनाच्या अटी व शर्तींना अधीन राहून वाहतूक करता येईल; नियमबाह्य रेती वाहतूक केल्यास कारवाई केली जाईल, असे तहसीलदार सावंत यांनी सांगितले.

 

Web Title: Chakkajam of sand transporters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.