शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
2
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
3
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
4
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
6
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
7
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
8
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
9
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
10
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
11
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
12
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
13
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
14
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
15
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
16
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
18
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
19
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
20
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी

परीक्षा केंद्रावर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2020 6:24 PM

पाच जिल्ह्यांत अंमलबजावणी; १७२ परीक्षा केंद्रे निश्चित

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठाच्या उन्हाळी २०२० परीक्षांना १५ एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. त्याकरिता पाचही जिल्ह्यांत सुमारे १७२ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली असून, या केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य असणार आहे. त्यानुसार परीक्षा विभागाने प्राचार्यांना पत्र पाठविले आहे.विद्यापीठ अंतर्गत ३९४ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचा परीक्षांचे नियोजन चांगल्या पद्धतीने करण्यासाठी विद्यापीठाने तयारी चालविली आहे. परीक्षा शांततेत आणि कॉपीमुक्त होण्यासाठी केंद्राधिकारी, सहकेंद्राधिकारी नियुक्त करण्यात येतात. मात्र, काही महाविद्यालयांत परीक्षेदरम्यान चिरीमिरीचे प्रकार घडतात. एवढेच नव्हे तर परीक्षांवर योग्य नियंत्रण ठेवण्यासाठी अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ अशा पाचही जिल्ह्यांमध्ये फिरते पथकाचे गठनसुद्धा करण्यात येते. मात्र, असे असले तरी काही महाविद्यालयात परीक्षा केंद्रावर सामूहिक कॉपी चालत असल्याचे प्रकारही यापूर्वी निदर्शनास आले आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे आत आणि बाहेरील बाजूस दर्शनी भागात बसविण्याचे निर्देश दिले आहे. गतवर्षीपासून परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासंदर्भात आदेश बजावण्यात आले होते. मात्र, काही परीक्षा केंद्रावर प्राचार्यांना अंमलबजावणी केली. तथापि, काही परीक्षा केंद्र असलेल्या महाविद्यालयात अद्यापही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले नाही. त्यामुळे यंदा उन्हाळी परीक्षेदरम्यान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून तसा अहवाल पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यासंदर्भात प्राचार्य, संस्थाध्यक्षांना पत्र पाठविले आहे.

गैरप्रकाराला बसणार आळा परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यानंतर गैरप्रकाराला आळा बसेल, असा दावा परीक्षा विभागाने केला आहे. परीक्षेच्या तीन तासात नेमके काय झाले? याची तपासणी करावयाची असल्यास सीसीटीव्ही फुटेज तपासता येणार आहे. सीसीटीव्ही लागणार असल्यामुळे विद्यार्थीसुद्धा गैरप्रकाराचा मार्ग स्वीकारणार नाही, असा विश्वास विद्यापीठाला आहे. विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आणि शैक्षणिक बाबी दृढ व्हाव्यात, यासाठी परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

परीक्षा केंद्रावर गैरप्रकाराला आळा बसविण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येतात. मात्र, सीसीटीव्ही कॅमेऱ्याची यात भर पडणार आहे. ही बाब विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हिताची आहे. केंद्रावरील गैरप्रकाराला आळा बसण्यास मदत होईल.- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ, अमरावती विद्यापीठ

टॅग्स :Amravatiअमरावतीuniversityविद्यापीठcctvसीसीटीव्ही