शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' कुटुंबातील आणखी १४ जणांची जातवैधता रद्द ! जातवैधता प्रमाणपत्रे रद्द का ठरलीत ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 13:32 IST

Amravati : अनुसूचित जमातीतील 'मन्नेरवारलू' जमातीच्या जातवैधतेबाबतचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महसूल सेवेत कार्यरत दोन तहसीलदारांची जातवैधता रद्द ठरल्यानंतर, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड झालेल्या आणखी एका उमेदवाराचे जातवैधता प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अनुसूचित जमातीतील 'मन्नेरवारलू' जमातीच्या जातवैधतेबाबतचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महसूल सेवेत कार्यरत दोन तहसीलदारांची जातवैधता रद्द ठरल्यानंतर, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड झालेल्या आणखी एका उमेदवाराचे जातवैधता प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आले. आणखी याच कुटुंबातील तब्बल १४ जणांचे 'जातप्रमाणपत्र व जातवैधता' प्रमाणपत्र रद्द झाल्याची बाबही पुढे आली आहे.

छत्रपती संभाजीनगर महसूल विभागात तहसीलदार म्हणून कार्यरत दत्ता बळीराम निलावाड व अमरावती विभागात तहसीलदार म्हणून कार्यरत उत्तम सयाजी निलावाड यांचे अनुसूचित जमातीतील 'मन्नेरवारलू' जमातीचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द ठरल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र वित्त आणि लेखा सेवा विभागात सहायक संचालक वर्ग १ पदावर ५ जानेवारी २०२६ रोजी निवड झालेल्या शिल्पा उत्तम निलावाड या उमेदवाराचे 'मन्नेरवारलू' अनुसूचित जमाती प्रवर्गाचे 'सशर्त जातवैधता' प्रमाणपत्र ९ जानेवारी २०२६ रोजी अवैध ठरविले आहे. आणखी याच कुटुंबातील तब्बल १४ जणांचे 'जातप्रमाणपत्र व जातवैधता' प्रमाणपत्र रद्द झाल्याची बाब पुढे आली आहे.

अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती किनवट यांनी या १४ जणांचे जातप्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र ६ नोव्हेंबर २०२६ रोजी रद्द केले आहे. या निर्णयाने राज्यभरात शासनाची फसवणूक करून समितीपासून वस्तुस्थिती लपवून अनुसूचित जमातीचे जातवैधता प्रमाणपत्र मिळविणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. शिवजीत उत्तम निलावाड याचा 'मन्नेरवारलू' जमातीचा दावा २५ ऑगस्ट २०२३ रोजी रद्द ठरला होता. त्याच आदेशात या १४ जणांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द ठरले होते. पण, उच्च न्यायालयात प्रकरण गेले होते. आता पुन्हा पुनर्पडताळणी होऊन दुसऱ्यांदा या सर्वांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द ठरले आहे.

जातवैधता प्रमाणपत्रे रद्द का ठरलीत ?

पोलिस दक्षता पथकाला कुटुंबातील रक्तनात्याच्या शालेय अभिलेखात जातीच्या नोंदी मुनूरवार, मनूरवाड, मनूरवार अशा आढळून आलेल्या आहेत. जात रकान्यात 'लू' हा शब्द वेगळ्या शाईने वेगळ्या हस्ताक्षरात लिहून फेरबदल करण्यात आले.रक्तनातेवाइकांच्या दावाविरोधी असलेल्या जातीचे पुरावे तत्कालीन समितीपासून लपवून जातवैधता प्रमाणपत्रे मिळविली.

यांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द ठरले

माधव बालाजी निलावाड, भानुदास बळीराम निलावाड, विवेक दिगांबर निलावाड, स्वाती दिगांबर निलावाड, ज्योत्स्ना व्यंकट निलावाड, नागेश व्यंकट निलावाड, मयुरी माधव निलावाड, सुभाष बालाजी निलावाड, मारोती बळीराम निलावाड, व्यंकटी बळीराम निलावाड, स्नेहा व्यंकट निलावाड, सुप्रिया माधव निलावाड, स्वप्निल व्यंकट निलावाड, पंकज मारोती निलावाड यांचे जातवैधता प्रमाणपत्र रद्द ठरले आहे.

"महाराष्ट्रातील 'मन्नेरवारलू' या जमातीचा उगम आंध्र प्रदेशमधून झाल्यामुळे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (सुधारणा) कायदा २००२ प्रमाणे आंध्र प्रदेश राज्यातून 'मन्नेरवारलू' जमात वगळली असून, त्याऐवजी कोलावार अशी दुरुस्ती करून सुधारणा केली आहे. त्याच धर्तीवर राज्यातही दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी शासनाकडे केली आहे. परंतु, अद्यापही प्रलंबितआहे."

- अॅड. प्रमोद घोडाम, राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष ट्रायबल फोरम

English
हिंदी सारांश
Web Title : 14 More from Family Lose Caste Validity! Certificates Cancelled?

Web Summary : Following two Tahsildars, 14 more from a family had their 'Mannerwarlu' caste validity certificates cancelled. The Kinwat committee cited discrepancies in school records and concealed familial ties to invalidate the certificates. Discrepancies included altered caste entries and suppressed evidence.
टॅग्स :AmravatiअमरावतीCaste certificateजात प्रमाणपत्रfraudधोकेबाजी