कारची दुचाकीला धडक; एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 06:00 IST2019-09-26T06:00:00+5:302019-09-26T06:00:59+5:30

पोलीस सूत्रांनुसार, सचिन विश्वनाथ काळे (३५, रा. महिममापूर) असे मृताचे नाव आहे. तो याच गावातील शरद रामदास सपकाळ याच्यासोबत दुचाकी (एमएच २७ एके ५२३६) वर मागे बसून दर्यापूरहून गावाकडे परत येत होता. महिमापूरच्या अलीकडे १० किमीवर चिपर्डा फाट्यावर ते लघुशंकेकरिता थांबले.

Car bike lash; One killed | कारची दुचाकीला धडक; एक ठार

कारची दुचाकीला धडक; एक ठार

ठळक मुद्देचिपर्डा फाट्यावरील घटना : चालक पसार, जखमीवर अमरावतीत उपचार

लोकमत न्यूज नेटवर्क
दर्यापूर : तालुक्यातील चिपर्डा फाट्यावर रात्री पावणेआठच्या सुमारास चारचाकीने दुचाकीला मागून धडक दिल्याने महिमापूर (ता. दर्यापूर) येथील एका युवकाचा मृत्यू झाला, तर दुचाकीचालक जबर जखमी झाला आहे. त्याला अमरावती येथे हलविले. धडक देणारी चारचाकी माटरगाव येथील असल्याची माहिती मिळाली.
पोलीस सूत्रांनुसार, सचिन विश्वनाथ काळे (३५, रा. महिममापूर) असे मृताचे नाव आहे. तो याच गावातील शरद रामदास सपकाळ याच्यासोबत दुचाकी (एमएच २७ एके ५२३६) वर मागे बसून दर्यापूरहून गावाकडे परत येत होता. महिमापूरच्या अलीकडे १० किमीवर चिपर्डा फाट्यावर ते लघुशंकेकरिता थांबले. दुचाकी सुरू करून ते निघणार एवढ्यात त्यांच्या मागून येत असलेल्या भरधाव चारचाकी (एमएच ३० एझेड ७००४) ने त्यांना धडक दिली. दुचाकीसह शरद सपकाळ या धडकेत रस्त्याच्या कडेला फेकला गेला, तर सचिनला कारने बॉनेटवर १०० मीटरवर नेऊन फेकले. गंभीर जखमी झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यादरम्यान चालक वाहन तेथेच सोडून पळाला.अपघाताची माहिती मिळताच खल्लारचे पोलीस निरीक्षक अभिजित अहिरराव यांनी उपनिरीक्षक गजरे, हेडकॉन्स्टेबल राजू विधळे, अविनाश ठाकरे यांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी जखमी शरदला प्रथम दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात आणले. त्यानंतर त्याला अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले.

चारचाकी पोलीस पाटलाची
खल्लार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माटरगाव येथील पोलीस पाटील नितीन तायडे यांच्या मालकीची सदर चारचाकी असल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र, चालकाचा शोध लागलेला नाही. खल्लार पोलिसांत गुन्हा दाखल करणे सुरू होते.

Web Title: Car bike lash; One killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.