फोटो पी १२ धारणी फोल्डर
धारणी : तालुक्यातील बासपाणी फाट्यालगत केलेल्या कारवाईत तब्बल ३९ किलो गांजा जप्त करण्यात आला. स्थानिक पोलिसांनी १२ मार्च रोजी मध्यरात्री ही धाडसी कारवाई करण्यात आली. मेळघाटातील गांजा तस्करीचे कनेक्शन मध्य प्रदेशशी जोडले जात आहे. दुचाकीवरून ही गांजा वाहतूक होत होती.
धारणीचे ठाणेदार विलास कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात अधिकारी व कर्मचारी यांनी बासपाणी फाटा येथे सापळा रचून केलेल्या या कारवाईत एकूण चार आरोपी व एका अल्पवयीन मुलाला गांजा या अंमली पदार्थाची वाहतूक करताना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याजवळून ३ लाख ९१ हजार ७०० रुपये किमतीचा एकूण ३९ किलो १७० ग्रॅम गांजा या वनस्पतीची पान व फुले, १ लाख रुपये किमतीच्या वाहतुकीकरिता वापरलेल्या दोन दुचाकी, तीन मोबाईल हँडसेट असा एकूण ५ लाख १ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
३० ते ५० रुपयांत मिळतो गांजा
धारणी शहरात नेहमीच गांजाची तस्करी केली जाते. मध्य प्रदेशातून गांजा धारणीत आणला जातो. ठोक विक्रेते छोटे पॅकेट बनवून ३० ते ५० रुपयांना विक्री करतात. एक ते दोन चिलम ओढता येईल इतका माल त्या पॅकेटमध्ये असतो. टिंगऱ्या रोड, नेहरू नगर, मांडवा रोड, दुबई मोहल्ला या भागात खरेदी-विक्रीचे जाळे पक्के विणलेले आहे. त्यांचीच वर्दळ या भागात असते. यामुळे पादचाऱ्यांना आसमंतात गांजाचा धूर सहन करीत पुढे जावे लागते.
पान २ ची लिड