मुकप्रचारासाठी उमेदवार झालेत ‘जागल्या’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:11 IST2021-01-15T04:11:38+5:302021-01-15T04:11:38+5:30

पोलीस, महसूल प्रशासन सज्ज तिवसा : तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. दरम्यान, उमेदवार ...

Candidates for silent campaign 'awakened' | मुकप्रचारासाठी उमेदवार झालेत ‘जागल्या’

मुकप्रचारासाठी उमेदवार झालेत ‘जागल्या’

पोलीस, महसूल प्रशासन सज्ज

तिवसा : तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. दरम्यान, उमेदवार त्यांचे कार्यकर्ते, गावपुढारी व पॅनेलप्रमुखांनी गुरुवारची रात्र जागून काढली. विजयासाठी प्रत्यक्ष मतदानापूर्वी मूकप्रचाराची कसरत करण्यात आली.

तालुक्यातील --- ग्रामपंचायत अविरोध झाल्याने २८ ग्रामपंचायतींमधील २४६ जागांसाठी ६०० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मतदानासाठी तिवसा व कु-हा पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे. यात तिवसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक पोलीस निरीक्षक, ७ अधिकारी, २७ पोलीस कर्मचारी, सीआरपीएफची एक तुकडी, ६९ होमगार्ड असा बंदोबस्त राहणार आहे. तालुक्यातील १५ उमेदवार बिनविरोध निवडून आले.

Web Title: Candidates for silent campaign 'awakened'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.