शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

कपाशीवर बोंडअळीचा 'अटॅक'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 00:26 IST

उपविभागीय कार्यालयामार्फत अमरावती व भातकुली तालुक्याचा क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत कीड सर्वेक्षक व कीड नियंत्रक यांनी दौरा केला.

ठळक मुद्देव्यवस्थापन महत्त्वाचे : कृषी विभागाचा शेतकºयांना सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : उपविभागीय कार्यालयामार्फत अमरावती व भातकुली तालुक्याचा क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत कीड सर्वेक्षक व कीड नियंत्रक यांनी दौरा केला. यावेळी पहिल्या टप्प्यातील पेरणी झालेल्या कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळले आहे. यासाठी वेळीव व्यवस्थापन करण्याचा सल्ला शेतकºयांना देण्यात आला.या गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी शेतकºयांनी शेताचे प्रथम निरीक्षण करावे. गुलाबी बोंडअळी ही पीक पात्या-फुले व बोंडावर असताना पिकावर येऊन कपाशीच्या बोंडात शिरते. एकदा की अळी बोंडात शिरली की छिद्र बंद होते. बोंडाचे वरून निरीक्षण केले तरी प्रथमदर्शी ती दिसून येत नाही. परंतु या अळीमुळे प्रादुर्भावग्रस्त बोंड ही अपरिपक्व अवस्थेतच फुटतात. त्यामुळे कापसाची प्रतवारी खराब होते. बोंडांतील अळळ्या रूईमध्ये छिद्र करून सरकी खातात. त्यामुळे रूईची प्रतवारी खराब होते व सरकीमधील तेलाचे प्रमाण खालावते व बियाण्यांची उगवणशक्ती कमी होते. या अळीच्या व्यवस्थापनासाठी क्विनॉलफॉस २५ टक्के इ.सी. २० मिली, प्रोफेनोफॉस ५० इ.सी., फ्लुबेंडामाईड ३९.३५ टक्के प्रवाही २.५ प्रती १० लिटर पाण्यात मिसळून यापैकी एका कीटकनाशकाची फवारणी करावी, असा सल्ला दुर्गापूर येथील कृषी संशोधन केंद्राचे कृषी शास्त्रज्ञ के.पी.सिंग तसेच कीड नियंत्रक वैशाली वानखडे, राहुल देशमुख यांनी दिला आहे.पहिल्या टप्प्यात पेरणी झालेल्या कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. पावसाच्या खंडामुळे प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.शेतकºयांनी पिकाचे निरीक्षण करून वेळीच उपाययोजना केल्यास नुकसान टाळता येते. यासाठी जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.- प्रीती रोडगे,उपविभागीय कृषी अधिकारी, अमरावती