शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

आंतरराज्यीय दोन टोळ्यांनी केल्या शहरात घरफोड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 1:16 AM

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घरफोडीतील आंतरराज्यीय टोळीतील दोन आरोपींना अटक केल्यानंतर आता दुसरी टोळीसुद्धा गजाआड केली. या दोन्ही टोळ्यांतील आरोपींकडून पोलिसांनी आतापर्यंत ९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

ठळक मुद्देनऊ लाखांचा मुद्देमाल जप्त : आणखी दोन आरोपींना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घरफोडीतील आंतरराज्यीय टोळीतील दोन आरोपींना अटक केल्यानंतर आता दुसरी टोळीसुद्धा गजाआड केली. या दोन्ही टोळ्यांतील आरोपींकडून पोलिसांनी आतापर्यंत ९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. यातील अन्य आरोपींचा शोध पोलीस घेत आहे.गुरुवारी पोलीस आयुक्तालयात पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी घेतलेल्या पत्रपरिषदेतून या टोळ्यातील चोरांची माहिती माध्यमांना दिली. गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने उत्कृष्ट टीम वर्क करून या घरफोडींचा छडा लावल्याचे हे यश कौतुकास्पद असल्याचे सीपी बाविस्कर म्हणाले. शहरात खिडकी टोळीने धुमाकूळ घालून राठीनगर व शारदानगरातील टावरी यांच्याकडे रात्रीतून चोरी करून पलायन केले. एका पाठोपाठ घडलेल्या चोरीच्या घटनांमुळे चोरांनी पोलिसांना आव्हानच केले होते.काही महिन्यांपासून गुन्हे शाखेचे पोलीस चोरींचा मागोवा घेत होते. दरम्यान, पोलिसांनी नुकतेच मालेगावातून सैय्यद शिराज सै.लियाकत (रा.बिड) व शेख फिरोज शेख रहमान (रा.अहमदनगर) या दोघांना अटक केली. त्यांनी राजापेठ हद्दीतील हरिओम कॉलनीतील रहिवासी अमोल चव्हाण यांच्या घरी चोरी केल्याची कबुली दिली. आरोपी शेख फिरोज हा चारचाकी वाहनाने सै.शिराज, शेख सिंकदर शेख अख्तर, शेख बबलू शेख रहेमान व शंकर तानाजी जाधव यांना घेऊन अमरावतीत येत होता. याच आरोपींच्या चौकशीत सै.सिंकदर व शेख बबलू या दोघांनी शारदानगरातील टावरी यांच्याकडे चोरी केल्याचे स्पष्ट झाले.पोलीस पथकाने गुरुवारी सै. सिंकदरला ताब्यात घेतले असून, दुसऱ्या पथकाने आरोपी शंकर तानाजी जाधव याला औरंगाबाद येथून ताब्यात घेतले. आरोपींनी नीलेश टावरी, राठीनगरातील सुधीर बारबुद्धे यांच्याकडे चोरी केल्याची कबुली दिली. या कारवाईमुळे शहरातील चोरी प्रकरणावर वचक बसणार आहे.शेजारी आपले सुरक्षकशहरातील घरफोड्या व चोरीच्या घटनांवर अंकुश लावण्याचे प्रयत्न पोलीस करीत आहे. मात्र, जनतेनेही स्वत:च्या संपत्तीच्या सुरक्षेसाठी काळजी घेणे आवश्यक आहे. सदनिका व बंगले असलेल्या ठिकाणी वॉचमन व सीसीटीव्ही कॅमेरे लाववेत, बाहेरगावी जाताना शेजाºयांना कळवावे, शेजारीच आपले सुरक्षक असून, नागरिकांनी आपल्या सुरक्षेविषयी काळजी घ्यावी, असे आवाहन सीपी बाविस्कर यांनी केले.नऊ लाखांचा मुद्देमाल जप्तपोलीस पथकाने आरोपींकडून एमएच २७ बीडी ६२४३, कार क्रमांक एमएच १६ बी झेड ३७८६ जप्त केली. याशिवाय आरोपी सैय्यद लियाकतकडून १०० गॅमचे सोने व आरोपी शेख फिरोजकडून ५०० ग्रॅम वजनाची चांदी असा एकूण ९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.प्रत्येकी पाच हजारांचा रिवार्डशहरातील घरफोड्यांच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी पोलीस उपायुक्त शशिकांत सातव, यशवंत सोळंके व प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे चार पथके तयार केली होती. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर पथकाचे प्रमुख होते. त्यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण गवंड यांच्या पथकातील उमेश कापडे, सुभाष पाटील, निखिल माहुरे, पोलीस उपनिरीक्षक राम गित्ते यांच्या पथकातील एएसआय अरुण कोडापे, अजय मिश्रा, सैय्यद इमरान, राजू आप्पा बाहेनकर, दिनेश नांदे, चालक दत्ता, पोलीस उपनिरीक्षक आशिष देशमुख यांच्या पथकातील एजाज, देवेंद्र कोठेकर, चालक अमोल, चौथ्या पथकातील पोलीस हवालदार प्रकाश जगताप, जावेद अहमद, सुधीर गुडधे व संग्राम भोजने यांनी उत्कृष्ट टीम वर्क करून घरफोडी प्रकरणांचा तातडीने छडा लावला. पोलीस आयुक्तांनी प्रत्येकी पाच हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे.

टॅग्स :Thiefचोर