अमरावती : जिल्हा परिषदेचे सन २०१८-१९ च्या २३ कोटी ५२ लाख ८५ हजार २०९ रुपयांच्या सुधारित व सन २०१९-२० या आर्थिक वर्षाचा २४ कोटी ३८ लाख ०२ हजार रुपयांच्या मूळ अंदाजपत्रक तसेच ३३ लाख १४ हजार २८४ रुपयांच्या अंदाजपत्रकाला सीईओ मनीषा खत्री यांनी मंजुरी दिली.सध्या आदर्श आचारसंहितेमुळे यावर्षीचा अर्थसंकल्प पदाधिकाऱ्यांऐवजी सीईओंनी मंजूर करावा, असे निर्देश राज्य शासनाचे होते. त्यानुसार हा अर्थसंकल्प २४ कोटी ३८ लाख ८ हजार रूपयांचे असून ३३ लाख १४,२८४ रूपये शिल्लकीच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. या अर्थसंकल्पात विविध विकासकामांसाठी २४ कोटी ३८ लाख ८ हजार इतक्या निधीची तरतूद केली आहे. सन २०१८-१९ च्या एकूण अंदाजपत्रकात ६ कोटी १० लाखांची तरतूद आहे. प्रत्यक्षात ८ कोटी ६२ लाख ८२ हजार २४९ एवढी रक्कम व्याजापोटी जिल्हा परिषदेला मिळाली. सन २०१९-२० साठी जमीन महसुलाचे २ कोटी मुद्रांक शुल्काचे ३ कोटी व व्याजाचे ६ कोटी ३० लाख अंदाजित उत्पन्न अपेक्षित आहे. झेडपीचे महत्त्वाचे लेखाशीर्ष असलेल्या लोकोपयोगी लहान कामे व योजनाांकरिता ५ कोटी, झेडपी सुरक्षेसाठी १० लाख, परिसर स्वच्छता, प्रसाधनगृह बांधकामासाठी २० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. हा बजेट सीईओ मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनात वित्त विभागाचे मुख्यलेखा व वित्त अधिकारी रविंद्र येवले, सहायक मुख्यलेखा वित्त अधिकारी दत्तात्रय फिसके, राजेश नाकील, लेखा अधिकारी प्रवीण मोंढे, सहायक लेखा अधिकारी मनीष गिरी यांनी तयार केला.
३३ लाख १४ हजार शिलकीचे अंदाजपत्रक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 23:03 IST
जिल्हा परिषदेचे सन २०१८-१९ च्या २३ कोटी ५२ लाख ८५ हजार २०९ रुपयांच्या सुधारित व सन २०१९-२० या आर्थिक वर्षाचा २४ कोटी ३८ लाख ०२ हजार रुपयांच्या मूळ अंदाजपत्रक तसेच ३३ लाख १४ हजार २८४ रुपयांच्या अंदाजपत्रकाला सीईओ मनीषा खत्री यांनी मंजुरी दिली.
३३ लाख १४ हजार शिलकीचे अंदाजपत्रक
ठळक मुद्देसुधारितमध्ये ११ कोटी ३० लाखांचेच महसुली उत्पन्न