शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
3
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
5
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
6
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
7
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
8
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
9
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
10
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
11
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
12
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
13
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
14
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
15
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
16
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
17
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
18
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
19
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर

फुग्याच्या सिलिंडरचा स्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 10:52 PM

नवरात्रोत्सवाच्या वर्दळीत सोमवारी सायंकाळी राजकमल चौकात फुग्यात भरण्याच्या गॅसचे सिलिंडर फुटले. या स्फोटात एका तरुणीसह १४ वर्षीय मुलगा जखमी झाला. बॉम्बस्फोटासारख्या कानठळ्या बसविणाऱ्या आवाजामुळे भीतीपोटी नागरिकांची पळापळ झाल्याने यावेळी प्रचंड खळबळ उडाली होती.

ठळक मुद्देराजकमल चौकातील घटना : दोन जखमी, नागरिकांमध्ये पळापळ

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नवरात्रोत्सवाच्या वर्दळीत सोमवारी सायंकाळी राजकमल चौकात फुग्यात भरण्याच्या गॅसचे सिलिंडर फुटले. या स्फोटात एका तरुणीसह १४ वर्षीय मुलगा जखमी झाला. बॉम्बस्फोटासारख्या कानठळ्या बसविणाऱ्या आवाजामुळे भीतीपोटी नागरिकांची पळापळ झाल्याने यावेळी प्रचंड खळबळ उडाली होती.सोमवारी सायंकाळी ५.४५ वाजता राजलक्ष्मी टॉकीजशेजारी असलेल्या महावितरण तक्रार निवारण केंद्रासमोर फुगेविक्रेत्याकडील छोटेखानी सिलिंडरचा स्फोट झाला. सिलिंडर वरचा भाग उड्डाणपुलाच्या वरून दुसºया बाजूला असलेल्या महापालिकेच्या प्रवेशद्वारालगत पोहोचला, एवढा हा स्फोट भीषण होता. तेथून पायी जात असलेली धारणी येथील प्रिया मालवीय (२०, ह.मु. गाडगेनगर) व गौरव विनोद भैसे (१४, रा.कॅम्प, बियाणी चौक) यांच्या अंगावर सिलिंडरचा तो तुकडा कोसळला. या लोखंडी तुकड्यामुळे प्रिया व गौरव हे जखमी झाले. प्रिया हिच्या डोक्याला, तर गौरवच्या हाताला जखमा झाल्या. उपस्थित नागरिकांनी त्यांना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. दरम्यानच्या काळात राजकमल चौकात तसेच यात्रा परिसरात अंबादेवीच्या दर्शनाला आलेल्या भाविकांमध्ये कानठळ्या बसणाºया आवाजाने पळापळ झाली. नेमके काय झाले, या उत्सुकतेपोटी मोठी गर्दी राजकमल चौकात एकच गर्दी झाली. राजकमल चौकातील पोलीस यंत्रणेने घटनास्थळी धाव घेतली. फुगे विक्री करणाºयाने तोपर्यंत पलायन केले. मात्र, त्याचा मोबाइल घटनास्थळी सापडला. त्याआधारे कोतवालीचे निरीक्षक दिलीप पाटील यांनी त्याचा शोध सुरू केला आहे.रात्री साडेनऊच्या सुमारास कोतवाली पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी मूळचा उत्तर प्रदेशातील खानसिंह सौदामसिंह कुसबा ठाकूर (२७, रा. यशोदानगर) याला अटक केली. पोलिसांनी जखमींच्या बयाणावरून त्याच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३३७, ३३८, २८५ अन्वये गुन्हा नोंदविला तसेच फुटलेले सिलिंडर जप्त केले.पोलिसांनी घेतली बाजारपेठेची झडतीघटनेनंतर महापालिका व कोतवाली पोलिसांनी तात्काळ बाजारपेठेची पाहणी करून सर्व फुगेविक्रेत्यांजवळील सिलिंडर जप्त करण्याची कारवाई केली. पोलिसांनी काही जणांचे सिलिंडर जप्त केले असून, फुग्यांची विक्री करणाऱ्यांची चौकशी सुरू केली होती.राजलक्ष्मी टॉकीजच्या शेडला छिद्रगॅस सिलिंडरच्या स्फोटानंतर लोखंडी तुकडा राजलक्ष्मी टॉकीजच्या फायबर शेडवर जाऊन भिडल्याने त्याला मोठे छिद्र पडले. सुदैवाने सिनेमाचा शो सुरू झाला होता, अन्यथा तिकीटघरासमोर उभे राहणाºया प्रेक्षकांमधून एखादा जखमी झाला असता.चौघांचा झाला होता मृत्यूजवाहर गेट रोडवर ६५ वर्षांपूर्वी फुग्याचा गॅस सिलिंडर फुटून चौघांचा मृत्यू झाल्याचे प्रकरण यावेळी गर्दीतून पुढे आले. तत्कालीन कलेक्टरने या सिलिंडरवर बंदी घातली होती. मात्र, अद्याप शहरात सार्वजनिक ठिकाणी फुग्यात गॅस भरण्याची पद्धत सुरुच आहे. याकडे विद्यमान जिल्हाधिकारी लक्ष देणार का, असा सवाल नागरिकांनी केला आहे.गॅसच्या दबावामुळे फुटले सिलिंडरपोलिसांचे बॉम्ब शोधक व नाशकदेखील घटनास्थळी पोहोचले. गॅस तयार करताना अतिरिक्त प्रेशरमुळे सिलिंडर फुटल्याचा कयास त्यांनी लावला. गॅस तयार करताना कॉस्टिक सोडा, अ‍ॅसिड पावडर, व्हिनेगर, कोळशाची भुकटी व कारपेट यांचा वापर केला जातो. हे रसायन एकत्र केल्यानंतर करून गॅस तयार होतो.महावितरण कार्यालयातील दुचाकी क्षतिग्रस्तराजलक्ष्मी टॉकीजशेजारीच महावितरणाचे तक्रार निवारण केंद्र असून, तेथील कर्मचाऱ्यांच्या चार ते पाच दुचाकी पार्किंगमध्ये लागल्या होत्या. सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर लोखंडी तुकडे उडून महावितरण कार्यालयाच्या खिडकीच्या कांचा फुटल्या. तेजराम उईके या वीज कर्मचाºयाच्या एमएच २७ बीवाय-७८७६ क्रमांकाच्या दुचाकीची डिक्की फुटली.