बांधकामाच्या वादातून युवकाची निर्घुण हत्या; गोपाल नगर नजीकचा स्वागतम कॉलनीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 23:35 IST2021-04-29T23:35:32+5:302021-04-29T23:35:41+5:30
प्राप्त माहितीनुसार, मृताची मानलेली बहीण यांच्याशी आरोपीचा बांधकामाचे रेतीवरून वाद होता.

बांधकामाच्या वादातून युवकाची निर्घुण हत्या; गोपाल नगर नजीकचा स्वागतम कॉलनीतील घटना
अमरावती : बांधकामाच्या रेतीच्या वादात मध्यस्थी करण्यास गेलेल्या एका युवकाची तीन जणांनी सेंट्रींग राफटरणे मारून निर्घृण हत्या केल्याची घटना राजापेठ ठाणे हद्दीतील गोपाल नगरनजीक स्वागतम कॉलनीत गुरुवारी रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास घडली.
पोलीस सूत्रानुसार, वैभव भीमराव तायडे (22 राहणार चवरे नगर) असे मृताचे नाव असून याप्रकरणी आरोपी दीपक तुरट (25), संकेत घुगे( 25 ),शुभम कुकडे (26 राहणार अमरावती) या आरोपीला ताब्यात घेतले आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृताची मानलेली बहीण यांच्याशी आरोपीचा बांधकामाचे रेतीवरून वाद होता. तो मध्यस्ती करण्याकरता मृतक गेला असता त्या वादातून आरोपीने संगणमत करून वैभवच्या चेहऱ्यावर डोक्यावर राफटरणे वार केले. गंभीर जखमी झालेल्या वैभवला इर्विन रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त शशिकांत सातव राजापेठचे ठाणेदार मनीष ठाकरे, पोलीस निरीक्षक किशोर शेळके यांचा ताफा घटनास्थळी पोहोचला घटनास्थळी नागरिकांनी बघायची गर्दी केली होती. पुढील तपास राजापेठ पोलिस करीत आहे.