शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटिशकालीन आणेवारी पद्धत शेतकऱ्यांसाठी घातक

By admin | Updated: November 9, 2014 22:26 IST

भारतावर अनिर्बंध सत्ता गाजविणारे ब्रिटिश देशातून निघून गेल्यानंतरही आणेवारीची पद्धत अद्यापही कायम आहे. यामुळे शेतकरीवर्ग मात्र देशोधडीला लागत असल्याने ही आणेवारी पद्धती बदलण्याची

चांदूरबाजार : भारतावर अनिर्बंध सत्ता गाजविणारे ब्रिटिश देशातून निघून गेल्यानंतरही आणेवारीची पद्धत अद्यापही कायम आहे. यामुळे शेतकरीवर्ग मात्र देशोधडीला लागत असल्याने ही आणेवारी पद्धती बदलण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. पारतंत्र्याच्या काळात शेतीचे उत्पन्न कमी प्रमाणात होते. त्या काळामध्ये शेती उद्योग श्रेष्ठ समजला जाई. कालांतराने देशाला स्वातंत्र्य मिळाले. शेती उद्योगामध्ये नवीन क्रांती झाल्यामुळे शेती उत्पादनात कमालीची वाढ झाली. मात्र स्वातंत्र्यानंतर किचकट कायद्यामुळे शेतीकडे दुर्लक्ष होऊ लागले. ब्रिटिश आपल्या देशातून निघून गेले तरी ब्रिटिशांनी तयार केलेले शेतीविषयक कायदे अद्यापही कायमच आहेत. ब्रिटिशांच्या काळात एका एकरात झालेल्या उत्पन्नासाठी १०० पैसे आणेवारी दाखविण्यात येत होती. निसर्गाने कोणतीही अवकृपा केली तरी आणेवारी जास्त दाखविली जात असल्याने शासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत देण्यात येत नव्हती. लावण्यात आलेली आणेवारी १५ सप्टेंबरपर्यंत दुर्लक्षित समजली जात होती. १५ आॅक्टोबरपर्यंत हंगामी तर १५ नोव्हेंबरपर्यंत सुधारित आणेवारी लावण्यात येत होती. लावल्या आणेवारीवर कुणीही आरोप घेतला नाही तर १५ जानेवारीपर्यंत शासनाकडून अंतिम आणेवारी जाहीर केली जात असे. ही पद्धत अद्यापही प्रचलित आहे. शेतकरी वर्ग आणेवारी पद्धत बदलविण्यासाठी पुरेशा प्रमाणात आग्रह धरीत नसल्याचे निदर्शनास येत आहे. ज्यावेळी निसर्गाची अवकृपा होते, पूर, अतिवृष्टीमुळे उत्पादनात घट होते, अशावेळी शेतकरी शासनाकडून मदतीच्या प्रतीक्षेत असतात. मात्र शासनाकडून अनेकदा ५० पैशांपेक्षा जास्त आणेवारी काढली जात असते यामुळे मोर्चे काढून, आंदोलने करूनही अनेकदा दखल घेतली जात नाही.मागील काही वर्षांपासून अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कधी कोरड्या तर कधी ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागतो. परंतु प्रशासनाच्यावतीने आणेवारी काढताना अनेकदा ५० पैशांपेक्षा जास्त आणेवारी काढली जाते. यामुळे शासनाच्यावतीने मिळणाऱ्या मदतीपासून अमरावती जिल्ह्यातील शेतकरी वंचित राहतात. यावर्षी शासनाच्यावतीने दुष्काळग्रस्तांसाठी विविध सोई-सवलती जाहीर करण्यात आल्या. शासनाने मात्र अमरावती जिल्ह्यातील जवळपास सर्वच गावांची आणेवारी ५० पैशांपेक्षा जास्त दाखविल्याने अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळग्रस्त कालावधीत पुरविण्यात येणाऱ्या एकाही सोई-सुविधांचा लाभ मिळत नाही. यामुळे शासनाने ब्रिटिशकालीन आणेवारी काढण्याची पद्धत रद्द करून सुधारित पद्धतीने आणेवारी काढावी, अशी मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)