थोडक्यातील बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:38 IST2021-01-08T04:38:41+5:302021-01-08T04:38:41+5:30

अमरावती : शहरातील शेगाव नाका ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळापर्यंतच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. त्यानुसार आशियात ...

Brief news | थोडक्यातील बातम्या

थोडक्यातील बातम्या

अमरावती : शहरातील शेगाव नाका ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळापर्यंतच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. त्यानुसार आशियात कॉलनी पुलापासून शिल्पकला कॉलनीपर्यंत रस्त्याच्या उजव्या बाजूचे काम सुरू असल्याने ती बाजू १३ फेब्रुवारीपर्यंत बंद राहील. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे.

.........

आस्थापनांनी ऑनलाईन सुविधा वापराव्यात

अमरावती : उद्योजक व आस्थापनांनी त्रैमासिक ई.आर.वन विवरणपत्र भरण्यासाठी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या ऑनलाईन विवरणाचा वापर करण्याचे आवाहन सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके यांनी केले आहे. ई.आर. वन विवरण ३१ जानेवारीपूर्वी दाखल करणे आवश्यक आहे.

...........

१७ नंबर अर्ज भरण्यासाठी २५ जानेवारीची मदत

अमरावती : दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी खासगीरीत्या म्हणजेच फॉर्म नंबर १७ भरून नावनोंदणी करण्यासाठी ११ जानेवारीपासून अर्ज करता येणार आहे. त्यासाठी २५ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. हा अर्ज आणि शुल्क ऑनलाईन भरावे लागणार आहेत.

...............

पंचायत विभागातील कर्मचारी सभा

अमरावती : जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची सभा सोमवारी दुपारी १२.३० वाजता आयोजित करण्यात आली होती. डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात पार पडलेल्या सभेत विविध प्रशासकीय कामांबाबत डेप्युटी सीईओ दिलीप मानकर, बीडीओ सुभाष बोपटे यांनी कर्मचाऱ्यांना सूचना देऊन कामांचा आढावाही घेतला.

.....................................

झेडपीत सांडपाणी व्यवस्थापन

अमरावती : जिल्हा परिषदेच्या विविध विभागासह परिसरात पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन खराब झाली आहे. त्यामुळे नवीन पाईप जोडणी करून पाणीपुरवठयाचे व्यवस्थापन करण्यात आले आहे. यासंदर्भातील उपाययोजना बांधकाम विभागाकडून केल्या जात आहेत.

Web Title: Brief news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.