शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बडनेरात लाचखोर मुख्याध्यापिका, सहायक शिक्षिका ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 21:21 IST

७५० रुपयांचा किरकोळ रकमेचा मोह नडला, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

बडनेरा : किरकोळ रकमेची लाच घेणाऱ्या मुख्याध्यापिका व सहायक शिक्षिकेला शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. बडनेरातील होलीक्रॉस हिंदी प्रायमरी शाळेचे हे कर्मचारी आहेत.पोलिस सूत्रांनुसार, संगीता फ्रान्सिस धनवटे (४२, रा. टीचर्स क्वार्टर) ही मुख्याध्यापिका व अश्विनी विजय देवतारे (३७, रा. भूमिपुत्र कॉलनी, काँग्रेसनगर रोड, अमरावती) असे लाच घेणाऱ्या सहायक शिक्षिका आरोपींची नावे आहेत. या प्रकरणातील तक्रारदाराचा मुलगा होली क्रॉस हिंदी प्रायमरी शाळेत इयत्ता तिसरीमध्ये शिकतो. शाळेला शासनाकडून शंभर टक्के अनुदान मिळत असतानाही वार्षिक शैक्षणिक शुल्क १५५० रुपये आकारले जाते. त्यापैकी ८०० रुपये यापूर्वी तक्रारदाराने दिले. उर्वरित ७५० रुपये देण्यासाठी वर्गशिक्षिका असलेली सहायक शिक्षिका व मुख्याध्यापिका वारंवार मागणी करीत असल्याची लेखी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अमरावती येथील कार्यालयाला देण्यात आली होती. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू होती.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक मारुती जगताप, अपर पोलिस अधीक्षक सचिंद्र शिंदे, उपअधीक्षक अभय अष्टेकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक भारत जाधव, केतन मांजरे, अंमलदार उपेंद्र थोरात, वैभव जायले, शैलेश कडू, चित्रा वानखेडे व राजेश बहिरट यांचा या कारवाईमध्ये सहभाग होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागTeacherशिक्षक