Bribe: चार हजारांची लाच घेताना भूमिअभिलेखचे दोन अधिकारी ‘ट्रॅप’
By प्रदीप भाकरे | Updated: October 20, 2022 19:05 IST2022-10-20T19:05:30+5:302022-10-20T19:05:56+5:30
Bribe News: प्रॉपर्टीकार्डवरील मयत प्रतिभा त्रिपाठी यांचे नाव कमी करण्यासाठीचे फाईल क्लिअर करण्यासाठी चार हजार रुपयांची लाच घेणाऱ्या अचलपूर येथील भूमी अभिलेख उप अधीक्षक देविदास जंगलुजी परतेती (५२) व सहाय्यक नजुल परिरक्षण भूमापक अमोल गिरी (४१, यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

Bribe: चार हजारांची लाच घेताना भूमिअभिलेखचे दोन अधिकारी ‘ट्रॅप’
अमरावती - प्रॉपर्टीकार्डवरील मयत प्रतिभा त्रिपाठी यांचे नाव कमी करण्यासाठीचे फाईल क्लिअर करण्यासाठी चार हजार रुपयांची लाच घेणाऱ्या अचलपूर येथील भूमी अभिलेख उप अधीक्षक देविदास जंगलुजी परतेती (५२) व सहाय्यक नजुल परिरक्षण भूमापक अमोल गिरी (४१, यांना रंगेहाथ पकडण्यात आले. उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, अचलपुर येथे एसीबीने गुरूवारी ही कारवाई केली.
वडिलांचे नावे असलेली अचलपूर येथील सिट नं.२५मधील प्लाॅट न.१०८ चे प्रॉपर्टीकार्डवरील मयत प्रतिभा त्रिपाठी यांचे नाव कमी करण्यासाठीचे फाईल क्लिअर करण्यासाठी अमोल गिरी व देविदास परतेती हे १५ हजार रुपये लाचेची मागणी करत असल्याची तक्रार एसीबीला प्राप्त झाली. त्या अनुषंगाने १२ सप्टेंबर रोजी केलेल्या पडताळणी करण्यात आली. त्यावेळी तडजोडअंती आठ हजार रुपये लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान गुरूवारी सापळा कारवाई दरम्यान अमोल गिरी याने पंचासमक्ष तक्रारदाराकडून ४ हजार लाच रक्कम स्वीकारली. त्याला रंगेहात पकडण्यात आले. दोन्ही आरोपींंना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध परतवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. एसीबीचे पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक अरुण सावंत व देविदास घेवारे, पोलीस उपअधीक्षक संजय महाजन यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सतिश उमरे व योगेशकुमार दंदे,
युवराज राठोड, कूणाल काकडे, विनोद कुजांम, शैलेश कडु, प्रदीप बारबुद्धे यांनी ही कारवाई केली.