शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मार्ट सिटी’ साठी विकासाची ब्ल्यू प्रिंट

By admin | Updated: October 15, 2015 00:22 IST

‘स्मार्ट सिटी’त अमरावती शहराचा समावेश झाल्यानंतर नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा देण्याचा अनुषंगाने बुधवारी पार पडलेल्या कार्यशाळेतून महापालिकेने विकासाची ब्ल्यू प्रिन्ट ठरविली.

कार्यशाळा : अधिकारी, अभियंते, लोकप्रतिनिधींचा सहभागअमरावती: ‘स्मार्ट सिटी’त अमरावती शहराचा समावेश झाल्यानंतर नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा देण्याचा अनुषंगाने बुधवारी पार पडलेल्या कार्यशाळेतून महापालिकेने विकासाची ब्ल्यू प्रिन्ट ठरविली. भविष्यातील विकास कामे ही लोकाभिमुख असावी, असे मत अधिकारी, अभियंते, लोकप्रतिनिधींनी मांडले.येथील शेगाव नाका स्थित अभियंता भवनमध्ये दोन सत्रात पार पडलेल्या कार्यशाळेचे उद्घाटन महापौर चरणजित कौर नंदा यांच्या हस्ते तर अध्यक्षस्थानी खा. आनंदराव अडसूळ होते. प्रमुख अतिथी म्हणून विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, पोलीस आयुक्त राजुकमार व्हटकर, आयुक्त चंद्रकांत गुडेवार, स्थायी समिती सभापती विलास इंगोले आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी विचार मांडताना ‘स्मार्ट सिटी’ हा उपक्रम खऱ्या अर्थाने नागरिकांसाठी असून त्याचा लाभ मिळाला पाहिजे. मूलभूत सोयी सुविधांना प्राधान्य देताना विकास कामात सामान्य माणूस यात अंतर्भाव असावा, ही बाब आवर्जून मांडण्यात आली. ब्ल्यू प्रिन्ट ही वास्तविकपणे उतरविण्यासाठी महापालिका पुढाकार घेत असल्याचे कौतूकही करण्यात आले.यावेळी ‘स्मार्ट सिटी’चा विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या अलिया कन्सलटिंग कंपनीचे प्रियेश तितरे, सुशील पाठक, निकिता डिक्रुज यांनी प्रात्यक्षिक सादर करुन भविष्यातील अमरावती महानगर कसे असेल, ही बाब समजावून सांगितली. कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात महापौर चरणजित कौर नंदा, आयुक्त चंद्रकांत गुडेवार, सभापती विलास इंगोले, पक्षनेता बबलू शेखावत, विरोधी पक्षनेता प्रवीण हरमकर, गटनेता प्रकाश बनसोड, गुंफाबाई मेश्राम आदी लोकप्रतिनीधी हजर होते.