शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

भररस्त्यावरचा खून रोखला... झाडावर शस्त्रक्रिया करून जीव वाचविला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:10 IST

फोटो - ०३एएमपीएच०१ कॅप्शन सप्तपर्णीच्या झाडाला अशाप्रकारे तोडण्यात आले. ०३एएमपीएच०२ - परिसरात नागरिक एकवटले व झाडाला उभे केले. ०३एएमपीएच०३ ...

फोटो - ०३एएमपीएच०१ कॅप्शन सप्तपर्णीच्या झाडाला अशाप्रकारे तोडण्यात आले.

०३एएमपीएच०२ - परिसरात नागरिक एकवटले व झाडाला उभे केले.

०३एएमपीएच०३ - झाडावर शस्त्रक्रिया करताना वनस्पती शास्त्र विषयाचे प्राध्यापक

गजानन चोपडे

अमरावती : ते पाच सहा वर्षांचे लेकरू रस्त्यावर गुमान होते. कुणाला काही त्रास नव्हता. उलट, त्याच्यामुळेच इतरांना सावलीचा आसरा होता. पण, एका क्रूरकर्म्याच्या मनात काळेबेरे आलेच. त्याने भर दुपारी त्याच्यावर कुऱ्हाडीचे घाव घातले. भररस्त्यावर होत असलेला हा खून पाहून काही जणांचे हृदय द्रवले. साऱ्या संवेदनशील माणसांनी ताकद एकवटून मारेकऱ्याचा सामना केला... अन् त्या निरागस जीवाला शेवटच्या क्षणी वाचविले... मृत्यूव्या कराल दाढेतून परत आलेला हा जीव म्हणजे सप्तपर्णीचे एक झाड होय!

हे झाड तुटण्यापासून लोकांनी रोखले, अर्धवट तुटलेल्या झाडावर शास्त्रशुद्ध शस्त्रक्रिया करून त्याला पुन्हा जोडले... ही हृदयद्रावक अन् तेवढीच प्रबोधनात्मक घटना घडली अमरावती शहरातील कठोरा मार्गावर...

पूर्वी चार जण मिळून झाड कापून काढत होते... कुणी साधी दखलही घेत नव्हते. पण आता चित्र पालटले आहे. चार-चौघांनी मिळून एका झाडाला जीवदान दिले. जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर घडलेला हा थरार दिलासादायकच...

कठोरा मार्गावरील नागरिक आपल्या परिवारासह ‘वृक्ष पालकत्व अभियानांतर्गत’ वृक्ष जगविण्यासाठी रणरणत्या उन्हात तन-मन-धनाने प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, नारायण ट्रेडर्स या दुकानाच्या मालकाने बुधवारी आपल्या माणसांकरवी कुऱ्हाडीने घणाघाती घाव मारून डौलदार पणे उभ्या असलेल्या वृक्षाला कु-हाडीचे घाव घालून पाडले. हे दृश्य बघून सर्व वृक्ष पालकांचे हृदय पिळवटले. संताप अनावर झाला. ज्या वृक्षाला आपण कुटुंबातील सदस्याप्रमाणे जोपासले त्याचा असा अंत व्हावा, हे कुणालाही मान्य नव्हते.

वृक्ष पालकत्व अभियानाची धुरा सांभाळणाऱ्या अमरावती गार्डन क्लबने घटनास्थळीच ठिय्या देऊन याप्रकरणी दोषीवर कारवाईची मागणी महापालिका व पोलीस प्रशासनाकडे लावून धरली. अखेर रात्री उशिरा अमरावती गार्डन क्लबचे अध्यक्ष डॉ. दिनेश खेडकर यांच्या तक्रारीवरून वृक्षतोडीचा गंभीर गुन्हा या प्रकरणात गाडगेनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला. या संपूर्ण प्रक्रियेत अमरावती गार्डन क्लबचे डॉ. दिनेश खेडकर, सुभाष भावे, डॉ. शशांक देशमुख, डॉ. रेखा मग्गीरवार, डॉ. गणेश हेडावू, डॉ. उमेश कन्हेरकर, डॉ. सुचिता खोडके, सुरेश राऊत, मिलिंद तट्टे, दिलीप नंदागवळी, अशोक हांडे, डॉ. चंदनसिंह राजपूत, अतिश पाटेकर, मंगेश अडगोकर, रामेश्वर चरपे, नीलिमा विखे, क्षीप्रा मानकर आदी सहभागी होते.

बॉक्स

झाडावर शास्त्रशुद्ध शस्त्रक्रिया

झाडाची कत्तल सुरू असताना प्रत्यक्षदर्शीने फोटो काढताच झाड तोडणाऱ्याने धूम ठोकली. त्यामुळे झाडाचा शेवटचा अगदी थोडा भाग जुळलेला होता. अशा परिस्थितीत गार्डन क्लबचे तज्ञ आणि वनस्पतीशास्त्र विषयाचे प्राध्यापक या सर्वांनी मिळून या वृक्षाला वाचविण्यासाठी “ऑपरेशन रीव्हायवल” हा अभिनव प्रयोग प्रयत्न केला. यामध्ये त्याच वृक्षाच्या फांद्या कापून तुटलेला भाग जोडण्यासाठी बांधण्यात देऊन, मॉसचे आवरण आणि होर्मोनची ट्रीटमेंट केली आहे. या कामात मंगेश वेलकर यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

कोट

वृक्ष संवर्धन मोहिमेंतर्गत अनेक नागरिक जुळले आणि त्यांनी वृक्षलागवड करून त्या वृक्षाचे जतन केले असे असताना त्याची कत्तल होणे म्हणजे एक गंभीर गुन्हा होय. अशा लोकांना कठोर शिक्षा करणारा कायदा अस्तित्वात यायला पाहिजे. तरच या कारवायांवर निर्बंध घालता येईल.

- डॉ दिनेश खेडकर, अध्यक्ष, अमरावती गार्डन क्लब