बाबुजींच्या जयंतीनिमित्त २ जुलै रोजी रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 11:10 PM2019-07-01T23:10:12+5:302019-07-01T23:10:44+5:30

लोकमत वृत्तपत्रसमूह व ब्लड स्टोअरेज सेंटर हायटेक हॉस्पिटल अमरावती, लाईफलाईन ब्लड बँक नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने 'लोकमत'चे संस्थापकीय संपादक तथा ज्येष्ठ स्वातंत्र सेनानी स्व.जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंती निमित्ताने सोमवार, २ जुलै रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ३ वाजेपर्यंत लोकमत कार्यालय व ग्रामीण रुग्णालय वरूड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

Blood donation on 2nd July on the occasion of Babuji's birth anniversary | बाबुजींच्या जयंतीनिमित्त २ जुलै रोजी रक्तदान

बाबुजींच्या जयंतीनिमित्त २ जुलै रोजी रक्तदान

Next
ठळक मुद्दे‘लोकमत’चा सामाजिक उपक्रम : सहभागी होण्याचे आवाहन

अमरावती : लोकमत वृत्तपत्रसमूह व ब्लड स्टोअरेज सेंटर हायटेक हॉस्पिटल अमरावती, लाईफलाईन ब्लड बँक नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने 'लोकमत'चे संस्थापकीय संपादक तथा ज्येष्ठ स्वातंत्र सेनानी स्व.जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंती निमित्ताने सोमवार, २ जुलै रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ३ वाजेपर्यंत लोकमत कार्यालय व ग्रामीण रुग्णालय वरूड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक-युवती, नागरिक, सेवाभावी संस्था, शासकीय खासगी संस्था, समाजसेवक, सामाजिक राजकीय कार्यकर्ता, युवा नेक्स्ट व सखी मंच सदस्य रक्तदान शिबिरात सहभागी होऊ शकतात. प्रत्येक रक्तदात्याला रक्तदाता कार्ड, रक्तदान प्रमाणपत्र देण्यात येईल. या रक्तदान अभियानात जास्तीत-जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन लोकमत समूहातर्फे करण्यात आले आहे. शिबिराच्या अधिक माहितीसाठी लोकमत कार्यालय, विभागीय क्रीडा संकुल, मोर्शी रोड अमरावती येथे ९९२२४२७७९४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रक्तदाता संघाचे आयोजन
वरुड : स्व.जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त ग्रामीण रुग्णालय संलाग्नित रक्तदाता संघ व लोकमत परिवार सखीमंच, वरुडच्या वतीने २ जुलै रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन स्थानिक ग्रामीण रुग्णालयात सकाळी १० ते २.०० वाजे पर्यंत करण्यात आले आहे. रक्तदात्यांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन रक्तदाता संघ व ग्रामीण रुग्णालयाच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९९२२९३७६०२ या क्रमांकावर संपर्क करावा.

Web Title: Blood donation on 2nd July on the occasion of Babuji's birth anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.