BJP and Congress hopeful, cautious post of veterans in amravati | भाजप अन् काँग्रेस आशावादी, दिग्गजांचा सावध पवित्रा

भाजप अन् काँग्रेस आशावादी, दिग्गजांचा सावध पवित्रा

गणेश देशमुख 

अमरावती : देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या अमरावती जिल्ह्याने काँग्रेस पक्षावर नेहमीच प्रेम केले असले तरी २०१४ च्या निवडणुकीत भाजपची भगवी लहर अमरावती जिल्ह््यालाही प्रभावित करून गेली. आठपैकी चार आमदार ‘कमळा’वर निवडून आले. काँग्रेसच्या दोन नेत्यांनी ‘मोदी लाटे’ला छेद दिला. तर दोन अपक्ष उमेदवारांनी आपली ताकद अधोरेखित केली. या पार्श्वभूमीवर २०१९ च्या लढाईसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत.

भाजपकडे अमरावती, मोर्शी, मेळघाट आणि दर्यापूर हे मतदारसंघ आहेत. यापैकी मेळघाटचे प्रभुदास भिलावेकर आणि दर्यापूरचे रमेश बुंदिले हे आमदार झाले ते केवळ मोदी लाटेवर. अमरावतीचे सुनिल देशमुख आणि मोर्शीचे अनिल बोंडे हे आमदारद्वय अनुभवी असले तरी मूळत: भाजपचे नाहीत. ‘इलेक्टोरल मेरिट’ असणाऱ्या उमेदवारांचा अभाव ही भाजपची व स्वपक्षाबाबतची अविश्वसनीयता ही या दोघांची अडचण. त्यातून करण्यात आलेली ‘अ‍ॅडजस्टमेंट’ आणि मोदी ‘इफेक्ट’ अशा समिकरणाच्या परिणामाने दोघांचेही कमळ फुलले. तिवस्याच्या आमदार यशोमती ठाकूर या २०,४४१ हजारांच्या लक्षवेधी फरकाने निवडून आल्यात. धामणगावचे आमदार वीरेंद्र जगताप यांच्या मतदारसंघात मोदींनी सभा घेतली. संघ व भाजपचेही तेथे प्रभावी कार्य असताना काँग्रेसच्या जगतापांनी कमळावर ‘पंजा’ मारलाच. सत्ताधारी पक्षाला शतप्रतिशत यश मिळवायचे आहे त्यामुळेच अनिल बोंडे यांना औटघटकेचे का होईना; पण कृषीमंत्रिपद मिळाले. सुनिल देशमुख हे विदर्भ पाटबंधारे महामंडळाचे उपाध्यक्ष झाले. येणाºया काळात माजी राष्ट्रपतीपुत्र रावसाहेब शेखावत यांचे सुनिल देशमुखांसमोर काँग्रेसकडून आव्हान असेल. अनिल बोंडेंना शेतकऱ्यांच्या मुद्यांवर त्यांच्याच मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटना व काँग्रेसचे तरूण आक्रमकरित्या घेरू लागले आहेत. अचलपूर आणि बडनेरा अपक्ष आमदारांचे मतदारसंघ. बच्चू कडुंना मतदारसंघातील शेतकºयांच्या व सामान्यांच्या समस्यांसाठी पुरेशी वेळ देता आला नाही. अकोटचे भाजपचे आमदार प्रकाश भारसाकळे हे ऐनवेळी अचलपुरातून मांड ठोकण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

बडनेºयाचे अपक्ष आमदार रवि राणा यांच्या पत्नी नवनीत राणा या अपक्ष खासदार झाल्यात. दोघांनीही अलिकडेच पंतप्रधान मोदींची भेट घेतली. राणा यांना ऐनवेळी बडनेºयातून भाजप-सेनेचे समर्थन मिळेल असे बोलले जात आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे गमविण्यासाठी काही नाही. तर प्रदेशच्या नव्या कार्यकारिणीने काँग्रेसमध्ये जोश भरला असून पक्षाची ताकद वाढल्याचे चित्र आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सुर्यवंशी यांच्याबाबत पक्षांतर्गत नाराजी आहे. वंचित बहुजन आघाडीचे आव्हानही राहणार आहे. वंचितचा उमेदवार कोण? यावरही समिकरणे ठरतील.

२०१४मधील निवडणुकीत सर्वांत मोठा विजय :
मोर्शी : अनिल बोंडे (भाजप) । मते : ७१,६११ फरक ४०,१६२.
सर्वांत कमी मताधिक्याने पराभव : धामणगाव रेल्वे : अरूण अडसड (भाजप) - ९७४ ( विजयी - वीरेंद्र जगताप, काँग्रेस).

एकूण जागा : ८ । सध्याचे बलाबल
भाजप - ४, कॉँग्रेस-२, अपक्ष -२ , शिवसेना -०

Web Title: BJP and Congress hopeful, cautious post of veterans in amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.