शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

जैवविविधता संवर्धनाने ठरणार मानवाचे भविष्य

By admin | Updated: March 15, 2015 00:35 IST

जैव विविधतेचे संवर्धन करणे ही काळाची गरज असून ती प्रत्येकाची जबाबदारी आहे. आजमितीस जैवविविधता नष्ट होण्याच्या मार्गावर...

चांदूरबाजार : जैव विविधतेचे संवर्धन करणे ही काळाची गरज असून ती प्रत्येकाची जबाबदारी आहे. आजमितीस जैवविविधता नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने संपूर्ण मानव जातीचे भविष्य धोक्यात आले आहे. मानव जातीने पृथ्वीतलावर ताबा केला आहे. भूतलावरील वाढलेली प्राणीमात्रा, वनसंपदा यांचे संवर्धन व संगोपन वेळीच केले नाही तर भविष्यात मानव जातीचे अस्तित्वच धोक्यात येण्याचा इशारा प्र्रधान मुख्य वनसंरक्षक तथा महाराष्ट्र राज्य जैविक विविधता मंडळ नागपूरचे सचिव दिलीपसिंह यांनी केले. स्थानिक आनंद सभागृहात पंचायत समितीतर्फे आयोजित जैविक विविधता व्यवस्थापन समितीच्यावतीने तालुकास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनपर भाषणात ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, दिलीप गुजर, वनराई संस्थेचे अध्यक्ष मधुकर घारड, प्राचार्य विजय टोम्पे उपस्थित होते. अध्यक्ष म्हणून पं.स.चे उपसभापती राजेश सोलव व गटविकास अधिकारी तुकाराम टेकाडे उपस्थित होते.जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांनी नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे चिमण्यांचा चिवचिवाट नाहीसा होत असल्याचे सांगून मानवी जीवनही धोक्यात आल्याचे सांगितले. दिलीप गुर्जर आपल्या भाषणातून बोलताना म्हणाले की वर्ष २००३ मध्ये जैविक विविधता कायदा अमलात आणण्याची गरज पडली. दैनंदिन जीवनातील उपयोगी पडणाऱ्या तुळस, हळद, बासमती तांदुळ, सागरगोटी आदी संपदा वाचविण्यासाठी हा कायदा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक तुकाराम टेकाडे यांनी व संचालन गजानन राऊत यांनी केले. या कार्यशाळेला ग्रा.पं.चे सचिव व सरपंच, पं.स कर्मचारी आदींची उपस्थितीती होती. आभार विस्तार अधिकारी मीना म्हसतकर यांनी मानले.