शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
2
आजचे राशीभविष्य १ ऑगस्ट २०२५ : भटकंती कराल, अचानक धनलाभ होईल! असा जाईल आजचा दिवस
3
न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”
4
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका
5
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कर्नाटक सरकारला निर्देश द्यावे; CM फडणवीसांचे केंद्राला पत्र
6
माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री
7
आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले?
8
भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका
9
खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट
10
EVM फेरफार अशक्य, तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध, राज्यातील मतदारसंघांमध्ये तपासणी; आयोगाचा दावा
11
एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल: डोनाल्ड ट्रम्प; अमेरिका-पाकचा व्यापार करार
12
ट्रम्प टॅरिफ: सर्वसामान्य अमेरिकनांच्या खिशाला फटका, अर्थव्यवस्थेला झटका, ५ लाख जॉब जाणार
13
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EDचे मुंबईत ८ ठिकाणी छापे; बनावट सामंजस्य करार,  कंपन्यांवर कारवाई
14
मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडणार; भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
15
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
16
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
17
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
18
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
19
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
20
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...

माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 18:09 IST

२०१७ मध्ये नाशिकच्या सुकरवाडा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या शासकीय कामात अडथळा आणि मारहाण प्रकरणातील शिक्षेमुळे बच्चू कडू यांचे अध्यक्षपद धोक्यात आले होते. या निर्णयामुळे अमरावतीच्या राजकीय आणि सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

अमरावती:अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावरून माजी आमदार बच्चू कडू यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था यांनी हा निर्णय घेतला असून, न्यायालयाने सुनावलेल्या एक वर्षाच्या शिक्षेचा दाखला देण्यात आला आहे.

२०१७ मध्ये नाशिकच्या सुकरवाडा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या शासकीय कामात अडथळा आणि मारहाण प्रकरणातील शिक्षेमुळे बच्चू कडू यांचे अध्यक्षपद धोक्यात आले होते. या निर्णयामुळे अमरावतीच्या राजकीय आणि सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

काय आहे प्रकरण?

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नियमांनुसार, जर बँकेच्या संचालकाला न्यायालयाने एक वर्षापर्यंतची शिक्षा सुनावली असेल, तर तो संचालक बँकेच्या कोणत्याही पदावर राहण्यास पात्र ठरत नाही.

याच नियमाचा आधार घेत बँकेच्या विरोधी गटातील १२ संचालकांनी, ज्येष्ठ संचालक हरिभाऊ मोहोड यांच्या नेतृत्वाखाली, बच्चू कडू यांना अपात्र ठरवण्याची मागणी सहकार विभागाकडे केली होती.

नाशिकच्या सुकरवाडा पोलीस ठाण्यात २०१७ मध्ये बच्चू कडू यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणि मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. २०२१ मध्ये नाशिक विशेष न्यायालयाने त्यांना एक वर्षाच्या कठोर कारावासाची शिक्षा सुनावली होती.

बच्चू कडूंचे नागपूर खंडपीठात आव्हान

दरम्यान, बच्चू कडू यांनी या शिक्षेविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले होते. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मार्च २०२५ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने बच्चू कडू यांना मोठा दिलासा देत विरोधी संचालकांनी दाखल केलेली अपात्रता याचिका फेटाळली होती. न्यायालयाने स्पष्ट केले की, बच्चू कडू यांच्याविरुद्ध अपात्रतेचा कोणताही ठोस आधार नाही, कारण त्यांनी शिक्षेवर स्थगिती मिळवली आहे.

मात्र, सहकार विभागाने पुन्हा एकदा न्यायालयाच्या एक वर्षाच्या शिक्षेचा आधार घेत बच्चू कडू यांना अपात्र ठरवले आहे. यामुळे सहकार विभाग आणि न्यायालयाच्या निर्णयांमधील तफावत चर्चेचा विषय ठरली आहे. बच्चू कडू या निर्णयाविरुद्ध पुन्हा कायदेशीर लढाई लढण्याची शक्यता आहे.

बँकेचा इतिहास काय?

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची संस्था आहे.

येथे बबलू देशमुख यांनी अनेक वर्षे वर्चस्व गाजवले आहे. २०२१ मध्ये बच्चू कडू यांच्या परिवर्तन पॅनलने बँकेच्या निवडणुकीत बबलू देशमुख यांचा पराभव करत सत्ता मिळवली होती. मात्र, त्यानंतर सत्तासंघर्ष तीव्र झाला.

बँकेचे तत्कालीन अध्यक्ष सुधाकर भारसाकळे आणि उपाध्यक्ष सुरेश साबळे यांनी दीड वर्षांच्या कार्यकाळानंतर राजीनामे दिले, आणि बच्चू कडू यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. फेब्रुवारी २०२५ मध्ये विरोधकांनी बच्चू कडू यांच्या गटातील पाच संचालकांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणला होता, परंतु सर्वोच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिली होती.

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडूAmravatiअमरावतीbankबँकBJPभाजपा