शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

भीम आर्मी, गाडगेनगर ठाणेदारात जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 21:48 IST

निवेदन देण्यास पोलिसांनी मनाई केल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे वाहन अडविण्यासाठी थांबलेल्या भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांची गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांच्यासोबत शाब्दिक चकमक झाली. रविवारी नियोजन भवनात आढावा बैठक सुरू असताना प्रवेशद्वाराबाहेर हा प्रकार घडला.

ठळक मुद्देपाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल : निवेदनासाठी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडविण्याचा होता बेत

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : निवेदन देण्यास पोलिसांनी मनाई केल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे वाहन अडविण्यासाठी थांबलेल्या भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांची गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांच्यासोबत शाब्दिक चकमक झाली. रविवारी नियोजन भवनात आढावा बैठक सुरू असताना प्रवेशद्वाराबाहेर हा प्रकार घडला.या घटनेनंतर गाडगेनगर पोलिसांनी भीम आर्मी भारत एकता मिशनचे प्रदेश सचिव मनीष साठे, अमरावती जिल्हाप्रमुख सुदाम बोरकर, शहरप्रमुख बंटी रामटेके, शहर उपप्रमुख प्रवीण बनसोड व हेमंत कोडापे यांना ताब्यात घेऊन ठाण्यात नेले होते. सरळ सेवा भरतीतील १५४ पोलीस उपनिरीक्षकांना मॅट कोर्टाच्या निर्णयावरून त्वरित सेवेत रुजू करून घ्यावे, या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यासाठी भीम आर्मीचे कार्यकर्ते नियोजन भवनाबाहेर उभे होते. दरम्यान गाडगेनगर पोलिसांनी कार्यकर्त्यांना मज्जाव केला. यावेळी गाडगेनगर ठाणेदार मनीष ठाकरेसह अन्य पोलिसांनी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. हा गोंधळ सुरू असताना भीम आर्मीचे सुदाम बोरकर व ठाणेदार ठाकरे यांच्यात शाब्दिक वाद झाला. अखेर पोलिसांनी भीम आर्मीच्या पाच जणांना ताब्यात घेऊन गाडगेनगर ठाण्यात नेले. त्यानंतर कार्यकर्त्यांविरुद्ध भादंविच्या कलम १४३, १८६, १३५ बिपी अ‍ॅक्टनुसार गुन्हा नोंदविला. यासंदर्भात ठाणेदारांशी संपर्क केला असता प्रतिसाद मिळाला नाही.ठाणेदारांवर भेदभावाचा आरोप१५४ पीएसआयना सेवेत रुजू करण्यासंदर्भातील निवेदन देण्यासाठी आम्ही गेलो होतो, संविधानात्मक पध्दतीने सीएम यांना निवेदन देणार होतो. मात्र, ठाणेदार मनीष ठाकरे आले. आम्हाला पाहताच हे लोक कसे काय उभे आहे, यांना टाका रे गाडीत, असे म्हटले आणि त्यांनी माझा हात पकडून लोटलाट केले. तुम्ही खाद्यांवर दुप्पटा टाकलेत, तर नेते झाले काय, असे म्हटले. हीच लोकशाही आहे का, या अन्यायाबद्दल आम्ही सीपींना निवेदन देऊ, वेळ पडल्यास कोर्टात न्याय मागू, न्याय मिळेपर्यंत आम्ही लढा देऊ, अशी प्रतिक्रिया भीम आर्मी जिल्हाप्रमुख सुदाम बोरकर यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.