भाऊसाहेब देशमुख यांचा जयंती उत्सव मुख्य सोहळा कार्यक्रम रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 05:58 IST2024-12-27T05:58:44+5:302024-12-27T05:58:44+5:30

श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला जयंती उत्सवाचा मुख्य सोहळा रद्द

Bhausaheb Deshmukh birth anniversary celebrations has been cancelled due to the passing away of former Prime Minister Manmohan Sing | भाऊसाहेब देशमुख यांचा जयंती उत्सव मुख्य सोहळा कार्यक्रम रद्द

भाऊसाहेब देशमुख यांचा जयंती उत्सव मुख्य सोहळा कार्यक्रम रद्द

अमरावती : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन झाल्यामुळे श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित भाऊसाहेब देशमुख यांचा  जयंती उत्सवाचा मुख्य सोहळा कार्यक्रम रद्द करण्यात आलेला आहे. 

श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी तसेच खासदार सुप्रिया सुळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार होती परंतु आज रात्री दहाच्या सुमारास देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे दुःखद निधन झाले त्यामुळे श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला जयंती उत्सवाचा मुख्य सोहळा रद्द करण्यात आला आहे अशी माहिती श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे. जयंती उत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेले इतरही कार्यक्रम रद्द करण्यात आले असून केवळ भाऊसाहेब देशमुख यांच्या आदरांजलीचा कार्यक्रम सकाळी आठ ते नऊ यादरम्यान होईल असे कळविण्यात आले आहे .

Web Title: Bhausaheb Deshmukh birth anniversary celebrations has been cancelled due to the passing away of former Prime Minister Manmohan Sing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.