भानखेडा जंगलाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 05:00 IST2020-04-22T05:00:00+5:302020-04-22T05:00:45+5:30

भानखेडा राखीव वनक्षेत्रातील दक्षिण चोरआंबा बीटमध्ये मंगळवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास पाच हेक्टर जंगलाला आग लागली. आगीचा परिसर हा घाटभागाचा व हिरवळीचा असल्यामुळे वन्यजिवांसह वनसंपदेची हानी झाली नाही. ही ुलावण्यात आली का, याबाबत वनविभाग शोध घेत आहे.

Bhankheda forest fire | भानखेडा जंगलाला आग

भानखेडा जंगलाला आग

ठळक मुद्देयंदाची पहिली घटना : चमू दाखल, ब्लोअरसह साहित्याचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नजीकच्या भानखेडा राखीव जंगलाला मंगळवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. जोराचा वारा असल्याने प्रारंभी आग आटोक्यात आणणे कठीण झाले. मात्र, वनविभागाच्या आग प्रतिबंधक दलाने आगीवर अर्ध्या तासात नियंत्रण मिळविले. आगीचे क्षेत्र हे हिरवळीचे असल्यामुळेच वनसंपदेचे फारसे नुकसान झाले नाही. यंदा वणवा पेटण्याच्या काळातील भानखेडा जंगलाला लागलेली आग ही पहिलीच घटना ठरली आहे.
भानखेडा राखीव वनक्षेत्रातील दक्षिण चोरआंबा बीटमध्ये मंगळवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास पाच हेक्टर जंगलाला आग लागली. आगीचा परिसर हा घाटभागाचा व हिरवळीचा असल्यामुळे वन्यजिवांसह वनसंपदेची हानी झाली नाही. ही ुलावण्यात आली का, याबाबत वनविभाग शोध घेत आहे.
दरम्यान, वडाळी येथील आग प्रतिबंधक दलाचे चार मजूर हे चार ब्लोअरसह पोहोचले होते. पोहरा येथील सात मजूर हे चार ब्लोअरसह आग विझण्यिासाठी आघाडीवर होते. आगीची माहिती वरिष्ठांना दिल्याचे वनपरिक्षेत्राधिकारी कैलास भुंबर यांनी दिली. वनपाल पी.टी. वानखडे, वनरक्षक आर.के. खडसे, एन.जी. नेतनवार, जे.जे. बोरले, डी.ओ. चव्हाण, व्ही.आर. उज्जैनकर आदींनी आग विझविण्यासाठी पुढाकार घेतला.

‘नासा’कडून आगीचे अलर्ट नाही
भानखेडा जंगलाला लागलेल्या आगीचे अलर्ट अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था (नासा) कडून मिळाली नसल्याची माहिती आहे. जंगल वा राखीव वनक्षेत्रात आग लागल्यास ‘नासा’ यावर्षीपासून वनविभागाला अलर्ट करणार होते. मात्र, भानखेडा जंगलाला लागलेल्या आगीचे क्षेत्र हे घाट प’िरसरात असल्याने वनकर्मचाऱ्यांना मोबाइलवर मंगळवारी अलर्ट मिळाले नाही, अशी माहिती वडाळीचे आरएफओ कैलास भुंबर यांनी दिली.
 

Web Title: Bhankheda forest fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.