शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

रेस्क्यु'द्वारे अस्वलीला पकडले

By admin | Updated: March 27, 2017 00:09 IST

अकोट तालुक्यातील अक्कलखेड शेतशिवारात शिरलेल्या अस्वलीला रेस्क्यु आॅपरेशनद्वारे पकडले.

'अक्कलखेडची घटना : अमरावती वनविभागाची कामगिरी अमरावती : अकोट तालुक्यातील अक्कलखेड शेतशिवारात शिरलेल्या अस्वलीला रेस्क्यु आॅपरेशनद्वारे पकडले. अमरावती वनविभागाच्या रेस्क्यु पथकाने तब्बल चार तास परिश्रम घेऊन अस्वलीला पकडून अकोट वनविभागाच्या स्वाधीन केले. अकोट वनपरिक्षेत्रातील पोपटखेड रोडवर स्थित असणाऱ्या अक्कलखेड येथील झाडे यांच्या शेतशिवारात अस्वल मुक्तसंचार करीत असल्याचे आढळून आले होते. याबाबत अकोट वनविभागाला माहिती मिळताच त्यांनी तत्काळ झाडे यांच्या शेतशिवाराकडे धाव घेतली. वनअधिकारी लोणकर यांनी तेथील स्थिती बघितली असता मानव व वन्यप्राणी संघर्ष होण्याची स्थिती नाकारता येत नव्हती. अकोट वनविभागाकडे रेस्कु पथक नसल्यामुळे त्यांनी तत्काळ अस्वलीबाबत अमरावती वनविभागातील उपवनसंरक्षक हेमंत मिना यांना माहिती दिली. त्यानुसार मिना यांच्या निर्देशानुसार रेस्कु पथकातील एस.के.वाजगे, अमोल गावनेर, फिरोज खान, सतीन उमक,मनोज ठाकुर, चंद्रकांत मानकर, किशोर खडसे यांनी रविवारी सकाळी अकोट गाठले. अकोट वनाधिकारी व अमरावतीचे रेस्कु पथक अक्कलखेड शेतशिवारात पोहोचले. तेथील सर्व परिस्थिती जाणून घेतल्यानंतर अमरावतीच्या पथकाने अस्वलीसाठी रेस्कु चालविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अस्वलीला बेशुध्द करण्यासाठी अकोट येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत औषधीची मात्र निश्चीत करण्यात आली. त्यानुसार अमोल गावनेर यांनी ट्रग्युलाईज गॅनद्वारे डॉट मारण्यासाठी अस्वलीवर निशाणा साधला. तीन ते चार तास वनकर्मचाऱ्यांनी अस्वलीचा मागोवा घेतला. त्यानंतर गावनेर यांनी अस्वलीला डाट मारून बेशुध्द केले. अस्वल बेशुध्द झाल्यानंतर तिला पिंजऱ्यात टाकून अकोट वनविभागाच्या स्वाधिन करण्यात आले. (प्रतिनिधी)