लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, कुठलाही गैरप्रकार घडणार नाही याबाबत दक्षता बाळगावी, असे निर्देश केंद्रीय निवडणूक निरीक्षक दिनेशकुमार यांनी बुधवारी दिले.केंद्रीय निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत बैठकीत ते बोलत होते. विविध पक्षांचे उमेदवार व त्यांचे प्रतिनिधीसह प्रशाकीय अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. जिल्ह्यात निवडणुका मुक्त व निर्भय वातावरणात पार पडणे आवश्यक आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेली आचारसंहिता पाळण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे. मतदारांना प्रलोभन देणे किंवा धाकदपट असे प्रकार कदापि घडता कामा नयेत. तसे काही आढळल्यास कडक कार्यवाही केली जाईल, असे दिनेशकुमार म्हणाले.आयोगाच्या विहित नियमांनुसार उमेदवारांनी खर्चाचे दस्तऐवज वेळोवेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल करणे आवश्यक आहे. निवडणुका शांततेत व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे व लोकशाही समृद्ध करण्यासाठी योगदान द्यावे, असेही आवाहन त्यांनी केले. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश नवाल, उप निवडणूक निर्णय अधिकारी उदय राजपूत, उपजिल्हाधिकारी अजय लहाने, विनोद शिरभाते यांच्यासह उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.नागरिकांसाठी केंद्रीय निवडणूक निरीक्षक उपलब्धबिहार कॅडरचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी दिनेशकुमार यांची अमरावती लोकसभेसाठी केंद्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून आयोगाने नियुक्ती केली आहे. मुक्त वातावरणात निवडणुका होण्यासाठी ते शासकीय विश्रामगृहात दुपारी ४ ते ५ या वेळेत उपलब्ध राहणार आहेत. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ७९८३९५२९३६ व दूरध्वनी क्रमांक ०७२१-२५५२५८५ असा असल्याचे माहिती विभागाने सांगितले.
Lok Sabha Election 2019; आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 21:30 IST
भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, कुठलाही गैरप्रकार घडणार नाही याबाबत दक्षता बाळगावी, असे निर्देश केंद्रीय निवडणूक निरीक्षक दिनेशकुमार यांनी बुधवारी दिले.
Lok Sabha Election 2019; आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे
ठळक मुद्देदिनेशकुमार : आढावा बैठकीत यंत्रणेला निर्देश