शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

सावधान! मोबाईलचा विरंगुळा ठरतोय विद्यार्थ्यांच्या टक्केवारीत घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 13:38 IST

अभ्यास करताना विरंगुळा म्हणून १० ते २० मिनिटे मोबाईल हाताळत असाल, तर आयुष्याच्या टर्निंग पॉइंटसाठी हे घातक ठरणार आहे.

ठळक मुद्देतयारी दहावी-बारावीची टक्केवारीत घट झाल्याचा निष्कर्ष

मोहन राऊतअमरावती: अभ्यास करताना विरंगुळा म्हणून १० ते २० मिनिटे मोबाईल हाताळत असाल, तर आयुष्याच्या टर्निंग पॉइंटसाठी हे घातक ठरणार आहे. हा मोह टाळून आगामी दोन महिने दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना जीवतोड मेहनत घ्यावी लागणार असल्याचा सूर बहुतांश पालकांमधून पुढे आला. याशिवाय गेल्या काही वर्षांमध्ये टक्केवारीत घट होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला.निमित्त होते धामणगाव रेल्वेमधील आदर्श महाविद्यालयात आयोजित परिसंवादाचे. दररोज दिवस व रात्री अभ्यासादरम्यान विरंगुळा म्हणून दहा ते वीस मिनिटे अवधी मोबाइलचा वापर विद्यार्थ्यांकडून होतो. यामध्ये अधिकाधिक वेळ निघून जात असल्याचे परिसंवादात पुढे आले. यंदा बारावीत असलेले विद्यार्थी कधीपासून मोबाइल हाताळतात, असा प्रश्न पालकांना करण्यात आला असता, काही विद्यार्थी इयत्ता आठवीपासून, तर काही नववीपासून मोबाइल बाळगत असल्याचे पुढे आले. बहुतांश पालकांनी इयत्ता दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आपल्या पाल्याला मोबाईल घेऊन दिल्याचे सांगितले.यंदा बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीला आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यात दहावीची परीक्षा सुरू होत आहे. या परीक्षेची तयारी शिक्षक व पालक वर्ग विद्यार्थ्या$ंकडून करून घेतली जात आहे.

टक्केवारीत घटजे विद्यार्थी मोबाईल हाताळतात, ते दहावीमध्ये यशस्वी ठरले तरी ते यश व टक्केवारी बारावीच्या परीक्षेत टिकून राहत नाही. यामागील मुख्य कारण म्हणजे दहावी ते बारावीदरम्यान वाढत्या वयानुसार मोबाइलचा वापर अधिक प्रमाणात होतो. गुगलमधून काही पॉइंट सर्च करण्यासाठी पाल्य पालकांकडे मोबाइलचा हट्ट धरतो. अकरावीत घेतलेला मोबाइल बारावीच्या परीक्षेपर्यंत त्या विद्यार्थ्याच्या जीवनाचा घटक बनतो. या मोबाइलमुळे दहावीत असलेली टक्केवारी बारावीच्या परीक्षेत टिकत नाही, ही बाब परिसंवादातून पुढे आली.आजारांमध्ये वाढमोबाइलचा अधिक वापर केल्याने आणि काही विशिष्ट पद्धतीने वापर केल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून, एकाग्रता कमी होणे, नवीन शिकण्याची क्षमता कमी होणे, ग्रहणशक्ती कमी होणे, थकवा येणे, चक्कर येणे, मळमळणे तसेच पोट बिघडण्याचीही शक्यता हे परिणाम प्रामुख्याने दिसून येतात.अल्झायमर, मोतीबिंदूबारा वर्षांवरील मुलांना मोबाइलवर अधिक प्रमाणात गेम्स खेळण्याच्या परिणामी अल्झायमरसारख्या आजारांचाही सामना लागू शकतो. विद्युत चुंबकीय लहरी सतत कानाच्या आसपास पोहोचत असल्याने केवळ कानच नाही, तर आसपासच्या अन्य पेशींवरही परिणाम होतो. तीव्र चुंबकीय लहरींमुळे डोळ्यांमध्ये जळजळ व मोतीबिंदूसारखे विकाराचे रुग्ण अमरावती शहरात उपचार घेत असल्याचा सूरदेखील परिसंवादातून निघाला.दहावी व बारावीत असताना मोबाइल वापरू नये. महत्त्वाचे काम असल्यास साधा मोबाइल वापरावा. मोबाइलच्या हव्यासामुळे परीक्षेत टक्केवारी घटत असल्याचा सूर परिसंवादातून पुढे आला आहे.डॉ. वाय.बी. गांडोळेप्राचार्य, आदर्श महाविद्यालय, धामणगाव रेल्वे

टॅग्स :MobileमोबाइलEducationशिक्षण