बीडीओ शंकर धोत्रे मृत्यू प्रकरण : बेकायदेशीर दबाव टाकणारा दुसरा पंचायत समिती सदस्य कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 04:03 PM2019-09-12T16:03:36+5:302019-09-12T16:03:53+5:30

चार सप्टेंबर रोजी हृदयविकाराने निधन झालेल्या अंजनगाव सुर्जी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शंकर धोत्रे यांच्यावर बेकायदेशीर काम करण्यासाठी दबाव टाकणाऱ्या एका पं.स. सदस्य विरोधात मृताचे आईने पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

BDO Shankar Dhotre Death Case: Who is the other Panchayat Samiti member who put pressure? | बीडीओ शंकर धोत्रे मृत्यू प्रकरण : बेकायदेशीर दबाव टाकणारा दुसरा पंचायत समिती सदस्य कोण?

बीडीओ शंकर धोत्रे मृत्यू प्रकरण : बेकायदेशीर दबाव टाकणारा दुसरा पंचायत समिती सदस्य कोण?

Next

अमरावती - चार सप्टेंबर रोजी हृदयविकाराने निधन झालेल्या अंजनगाव सुर्जी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शंकर धोत्रे यांच्यावर बेकायदेशीर काम करण्यासाठी दबाव टाकणाऱ्या एका पं.स. सदस्य विरोधात मृताचे आईने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. परंतु शंकर धोत्रे यांच्यावर बेकायदेशीर काम करण्यासाठी दुसरा एक पंचायत समिती सदस्य  दबाव टाकत होता. पण त्यांचे नाव तक्रारीत नसल्याने पंचायत विभागात व तालुक्यात  चांगली चर्चा रंगत आहे.

  मागील दोन महिन्यांत होणाऱ्या मासिक सभेमध्ये शिक्षण विभागाची गटप्रमुख पदभार बदलण्याचा ठराव घेण्यात येत होता. परंतु या विषयाला मृत गटविकास अधिकारी शंकर धोत्रे यांचा विरोध आपल्यामुळे या सदस्यांचे काही चालत नव्हते. त्यामुळे नेहमीच मासिक सभेला शंकर धोत्रे व काही पंचायत समिती सदस्यांमध्ये खटके उडाले. तसेच त्याविषयाची नोंद मासिक सभेच्या  अहवालामध्ये नोंद असल्याचे दिसून येते. विशेष बाब म्हणजे शंकर धोत्रे यांनी या विषयावर त्यांच्या विशेष पेन नोंद केल्याचे सुद्धा त्यांच्या घरी आढळून कागदपत्रांमध्ये आढळून आली या पंचायत समिती सदस्यांनी शिक्षण विभागाच्या ज्या शिक्षकांना केंद्रप्रमुख पदाचा पदभार द्यायचा होता, त्यांच्याकडून लाखो रुपयांची उलाढाल केल्याची चर्चासुद्धा पंचायत समिती व शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये बोलल्या जात आहे. दुसऱ्या सदस्याने आपण यामध्ये कुठेच आढळून न यावे याकरिता विशेष बाबीची काळजी घेतली. त्यामुळे मृताच्या आईने फक्त पंचायत समिती सदस्य नितीन पटेल यांच्या एकाच नावाने तक्रार दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे तसेच पोलिसांच्या चौकशीत तो दुसरा पंचायत समिती सदस्य गुन्ह्यात सहभागी असल्याची बाप समोर येईल का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

आठ दिवसांपासून वैद्यकीय मृत्यू अहवालसुद्धा ग्रामीण रुग्णालय अंजनगाव सुर्जीकडून पोलिस विभागाला अद्याप प्राप्त झाले नसल्यामुळे  हे आश्चर्य व्यक्त होत आहे.

शिक्षण विभागातील शिक्षकाच्याअंतर्गत राजकारणामुळे पंचायत समिती सदस्याचे खिसे चांगलेच गरम होत असल्यामुळे अश्या कर्तव्यदक्ष अधिकारांना बेकायदेशीर काम करण्याच्या तगाद्यापोटी आपला जीव गमवावा लागला. सदर नाव न सांगणाच्या अटीवर लोकमतला पंचायत समिती च्या एका अधिकाऱ्याने प्रतिक्रिया दिली.

Web Title: BDO Shankar Dhotre Death Case: Who is the other Panchayat Samiti member who put pressure?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.