रवी राणांविरुद्ध जामिनपात्र वाॅरंट जारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2022 21:00 IST2022-06-18T20:59:52+5:302022-06-18T21:00:21+5:30
Amravati News आमदार रवी राणा यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महानगरपालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाईफेकप्रकरणी जामिनपात्र वाॅरंट जारी केले आहे.

रवी राणांविरुद्ध जामिनपात्र वाॅरंट जारी
अमरावती : आमदार रवी राणा यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महानगरपालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाईफेकप्रकरणी जामिनपात्र वाॅरंट जारी केले आहे. राजापेठ पोलिसांनी गत काही दिवसांपूर्वी आमदार राणा यांचा अटकपूर्व जामीन रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याअनुषंगाने आमदार राणा यांना १७ जूनरोजी न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. आता न्यायालयाने याबाबत राणांविरुद्ध जामिनपात्र वाॅरंट जारी केले आहे. उच्च न्यायालयाचे वाॅरंट घेऊन राजापेठ पोलीस ठाण्याचे पथक आणि मुंबई पोलिसांचे पथक रवी राणा यांच्या मुंबई येथील फ्लॅटवर पोहोचले आहे. मात्र, पोलिसांच्या दोन्ही पथकांच्या हाती आमदार रवी राणा लागू शकले नाहीत.
भाजपला मतदान करू नये म्हणून दबाव
विधान परिषद निवडणुकीत भाजपला मतदान करू नये, म्हणून प्रकरणात वाॅरंट घेऊन अमरावती व मुंबईचे पोलीस घरी आले. मात्र, मुंबई खार येथील घरी नसल्याने त्यांना मिळू शकलो नाही. मतदान करू नये म्हणून महाविकास आघाडी दबाव आणत आहे. याला कायदेशीर उत्तर देईन.
रवी राणा, आमदार