शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
4
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
5
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
6
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
7
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
8
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
9
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
10
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
12
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
13
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
14
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
15
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
16
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
17
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
18
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
19
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
20
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य

२० डिसेंबरपासून फुलणार बहिरम यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 1:01 AM

लोकमत न्यूज नेटवर्क चांदूर बाजार : विदर्भाचे वैभव असलेल्या बहिरम यात्रेस यंदा २० डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. ग्रामीण संस्कृतीचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : विदर्भाचे वैभव असलेल्या बहिरम यात्रेस यंदा २० डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणारी ही यात्रा ‘शासकीय यात्रा’ म्हणून कधी गणली जाणार, अशी अपेक्षा वजा प्रश्न बहिरमबाबांच्या भक्तजनांतर्फे केला जात आहे. या यात्रेतील दुकानांसाठी १० ते १२ डिसेंबरदरम्यान बहिरम येथे लिलाव होणार आहे.मध्यप्रदेश व महाराष्ट्राच्या सीमेवर सातपुड्याच्या पायथ्याशी भरणारी बहिरम यात्रा ही ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवणारी यात्रा म्हणून ओळखली जाते. या यात्रेत मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव आपल्या कुळदैवताला नवस फेडण्याकरिता येत असतात. या यात्रेत शेतकरी बांधवसुद्धा मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. यात्रेत नवनवीन शेती साहित्य, अवजार विक्रीकरिता येतात. तसेच शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी बहिरम यात्रेच्या माध्यमातून प्रसिद्धी केली जात होती. मात्र, शासनाच्या उदासीन धोरणामुळे या यात्रेत शेतकरीभिमुख कार्यक्रमांचे आयोजन आता केले जात नाही. त्यामुळे शासनाच्या योजनांपासून अनेक शेतकरी कोसोदूर आहेत.जिल्हा परिषदेला दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न देणाºया या यात्रेत शिरजगाव, करजगाव, परतवाडा, कारंजा, बहिरम, मुलताई, बैतुल, भैसदेही या भागातील दुकानदार दुकाने थाटतात. पूर्वी घुंगराच्या आवाजाकरिता प्रसिद्ध असणारी ही यात्रा आमदार बच्चू कडू यांच्या पुढाकाराने तमाशामुक्त झाली. त्या जागी शंकरपट, कुस्तीसारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांची काही काळ रेलचेल सुरू राहिली. त्यानंतर झेडपीच्या तत्कालीन अध्यक्ष सुरेखा ठाकरे यांनी बहिरम यात्रेला ‘यात्रा महोत्सव’चे स्वरूप मिळवून दिले होते. या महोत्सवाच्या माध्यमातून यात्रेत मोठी रेलचेल वाढली होती. यंदा गुलाबी थंडीत बहिरम यात्रेत हंडी व रोडग्याच्या मैफली रंगण्यास, बहिरम यात्रेच्या निमित्ताने सुरुवात होत आहे. ही यात्रा ‘शासकीय यात्रा’ व्हावी तसेच बहिरामबाबांना शासकीय पूजेचा मान मिळवून देण्याकरिता जनप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.