शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा एका अल्पवयीन विद्यार्थिनीला ‘बॅड टच’, मसाजची ‘ऑफर’; क्रीडा शिक्षकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 11:46 IST

गाडगेनगर ठाण्यात पोक्सो, अॅट्रॉसिटी

अमरावतीशहरातील एका महाविद्यालयातील क्रीडा शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीला एकमेकांची मसाज करू, असे म्हणून तिचा विनयभंग केला. तिला पैसे देण्याचे आमिषसुद्धा दाखविले. ही घटना मंगळवार, २६ सप्टेंबर रोजी गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विश्वास जाधव (५०) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. विश्वास जाधव हा शहरातील एका महाविद्यालयात क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्याने महाविद्यालयातीलच एका १७ वर्षीय विद्यार्थिनीला मोबाइलवर कॉल करून क्रीडा विभागात बोलाविले. त्यानंतर त्याने तिला एका सेंटरवर आपण एकमेकांची मसाज करू, असे म्हटले. त्याकडे दुर्लक्ष करीत पीडित विद्यार्थिनी तेथून निघून गेली.

दरम्यान, क्रीडा शिक्षक विश्वास जाधव हा अन्य विद्यार्थिनींना बॅड टच करीत असल्याचे तिला समजले. त्यामुळे पीडित विद्यार्थिनी ही त्याच्यापासून दूर राहू लागली. त्यानंतरही विश्वास जाधव हा त्याच विषयावरून पीडित विद्यार्थिनीला वारंवार बोलत होता. त्याने तिला पैशांचे आमिषसुद्धा दाखविले. शिक्षक विश्वास जाधव याच्या या सततच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीने अखेर गाडगेनगर ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विश्वास जाधवविरुद्ध विनयभंग, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा व ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. सायंकाळी उशिरा पोलिसांनी आरोपीला अटक करण्यात आली.

पीडितेच्या तक्रारीवरून विनयभंग, पॉक्सो आणि अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

- गजानन गुल्हाने, पोलिस निरीक्षक, गाडगेनगर पोलिस ठाणे

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगStudentविद्यार्थीTeacherशिक्षकAmravatiअमरावती