बच्चू कडू यांचे बंधू, राजकुमार पटेल यांची पुतणी विजयी; ग्रामपंचायत निवडणुकीत आमदारांची बालेकिल्ल्यात बाजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 16:59 IST2022-12-20T16:58:23+5:302022-12-20T16:59:12+5:30
गजानन मोहोड - अमरावती : जिल्ह्यात २५७ ग्रामपंचायतींचे निकाल हाती येत आहेत. यामध्ये विद्यमान आमदारांनी त्यांच्या गावात बाजी मारली ...

बच्चू कडू यांचे बंधू, राजकुमार पटेल यांची पुतणी विजयी; ग्रामपंचायत निवडणुकीत आमदारांची बालेकिल्ल्यात बाजी
गजानन मोहोड -
अमरावती: जिल्ह्यात २५७ ग्रामपंचायतींचे निकाल हाती येत आहेत. यामध्ये विद्यमान आमदारांनी त्यांच्या गावात बाजी मारली आहे. यामध्ये माजी राज्यमंत्री तथा अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांचे बंधू भैय्या कडू मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत. तसेच मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांची पुतनी अस्मिता नरेंद्र पटेल विजयी झाल्या आहेत. जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये महाविकास अघाडीचे सरपंच विजयी झाले आहेत.
वरुड मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार यांच्या गव्हानकुंड गावात महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. याशिवाय मोर्शी तालुक्यातील तळणी ग्रामपंचायतमध्ये सरपंचपदी पत्नी तर पतीराज सदस्य झाले आहेत. मतदारांनी पती-पत्नी दोघांवरही विश्वास व्यक्त केल्यामुळे ‘जिथे सरपंचपदी बाई तिथे पतीराज करतात घाई’ म्हणण्यास आता वाव राहिलेला नाही.