शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

प्रशिक्षणास गैरहजर राहणा-या पोलिसांवर होणार कारवाई, कार्यक्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2017 6:33 PM

राज्यभरातील पोलीस दलाची कार्यक्षमता वाढविण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या प्रशिक्षणास गैरहजर राहणा-या पोलिसांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. पोलीस आयुक्तांच्या आदेशाने अशा कर्मचा-यांवर शिस्तभंग किंवा निलंबनाची कारवाई करण्यात येत असल्यामुळे आता ते प्रशिक्षणास जाण्यास टाळाटाळ करीत नसल्याचे निदर्शनास आले आहे. 

- वैभव बाबरेकर

अमरावती : राज्यभरातील पोलीस दलाची कार्यक्षमता वाढविण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या प्रशिक्षणास गैरहजर राहणाºया पोलिसांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. पोलीस आयुक्तांच्या आदेशाने अशा कर्मचा-यांवर शिस्तभंग किंवा निलंबनाची कारवाई करण्यात येत असल्यामुळे आता ते प्रशिक्षणास जाण्यास टाळाटाळ करीत नसल्याचे निदर्शनास आले आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था राखून जनतेला जीवित व वित्तहानीपासून संरक्षण देण्यासाठी पोलीस यंत्रणा कर्तव्य बजावत आहे. बदलत्या काळानुसार पोलीस दलाच्या कार्यक्षमतेत वाढ होणे अपेक्षित आहे. गुन्हेगारीचे स्वरूप, दहशतवादी हल्ल्यासारखे आव्हाने पोलिसांना पेलावे लागत आहेत. अशा विविध कृत्यांच्या अनुषंगाने पोलीस अधिक सक्षम होणे आवश्यक असून त्याचे मनोधैर्य वाढविणे गरजचे आहे. त्या अनुषंगाने राज्यातील पोलीस दलासाठी प्रशिक्षण धोरण राबविण्यात आले आहे. कोणत्याही कठीण प्रसंगी पोलीस मागे राहता कामा नये, यासाठी शासनातर्फे कठीण प्रशिक्षणाचे धोरण राबविण्यात आले आहे. मात्र, गेल्या काही महिन्यात निवड झालेले काही पोलीस कर्मचारी प्रशिक्षणास टाळाटाळ करताना आढळून आले आहे. सिक लीव्ह, आजार, अपघात वा कौटुंबिक कारणे सांगून प्रशिक्षणास गैरहजर राहणे, आदी कारणे सांगितले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यासंबंधी पोलीस आयुक्तांनी काही कर्मचाºयांवर कारवाई केली असून, यापुढेही प्रशिक्षणास टाळाटाळ करणाºया पोलिसांवर शिस्तंभग किंवा निलंबनाची कारवाई केली जाणार आहे. 

आधुनिक तंज्ञत्रानाच्या युगात पोलिसांना सक्षम राहणे गरजेचे आहे. मात्र, काही पोलीस कर्मचारी कोणतेही कारण सांगून प्रशिक्षणास जाण्यास टाळाटाळ करीत होते. अशा कर्मचाºयांवर शिस्तभंग किंवा निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे. कारवाईच्या धास्तीने आता पोलीस प्रशिक्षणास जात आहे. दत्तात्रय मंडलिक, पोलीस आयुक्त, अमरावती.

टॅग्स :PoliceपोलिसAmravatiअमरावती