अमरावतीत तरुणाचा गळफास लावून, मुलीचा विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 19:17 IST2023-03-22T19:17:04+5:302023-03-22T19:17:25+5:30
दोघांवरही जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अमरावतीत तरुणाचा गळफास लावून, मुलीचा विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न
अमरावती : एका २५ वर्षीय तरुणाने गळफास लावून तर एका अल्पवयीन मुलीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या भिन्न दोन घटना वलगाव व गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत २२ मार्च रोजी घडल्या. दोघांवरही जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी दोन्ही पोलीस तेथे पोहोचले आहेत.
वलगाव ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी २५ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात आल्यावर त्याला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयातील पोलीस चौकीकडून वलगाव पोलिसांना देण्यात आली.
दुसऱ्या घटनेत गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या १४ वर्षीय मुलीने विषारी औषधी प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात आल्यावर तिला देखील तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू आहेत. शाळकरी मुलीने एवढा टोकाचा निर्णय का घेतला, याबाबत अद्याप कळू शकले नाही.