शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

जनावराच्या अंगावर एसटी नेण्याचा प्रयत्न केल्याने चालकास शोकॉज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 22:06 IST

रस्त्यावर बसलेल्या गार्इंना बाजूला करण्याचे प्रयत्न न करता थेट अंगावर वाहन नेणाऱ्या बसचालकास वलगाव डेपोच्या स्कॉडने सोमवारी शोकॉज नोटीस बजावली. सुदैवाने वेळेवर गाई उठल्या, अन्यथा बसच्या मागील चाकात गाय येण्याची शक्यता होती.

ठळक मुद्देवलगाव डेपो स्कॉड कारवाई : अ‍ॅनिमल वेलफेअर बोर्डची दखल

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रस्त्यावर बसलेल्या गार्इंना बाजूला करण्याचे प्रयत्न न करता थेट अंगावर वाहन नेणाऱ्या बसचालकास वलगाव डेपोच्या स्कॉडने सोमवारी शोकॉज नोटीस बजावली. सुदैवाने वेळेवर गाई उठल्या, अन्यथा बसच्या मागील चाकात गाय येण्याची शक्यता होती.अमरावती-परतवाडा बस क्रमांक एमएच ४० एन-९७७२ वलगाव चौकातून पुढे जात असताना रस्त्यावर गार्इंचा कळप बसला होता. एसटी चालकाने हार्न न देता व बे्रक न दाबता थेट एसटी गार्इंच्या अंगावर नेली. मात्र, गाई उठत नसल्याचे पाहून चालकाने गायींना कट मारून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. गाय मागील चाकात येणारच होती, तेवढ्यात गाई उठल्याने दुर्घटना टळली. एसटी चालकाने गायींच्या अंगावर मुद्दामच बस नेल्याचा प्रकार त्याच मार्गाने जात असलेल्या वलगाव एसटी डेपोचा स्कॉड व अ‍ॅनिमल वेलफेअर बोर्ड आॅफ इंडियाचे हॉनरली अ‍ॅनिमल वेलफेअर आॅफिसर सागर मैदानकर यांच्या निदर्शनास आले. त्यांनी एसटीचा पाठलाग करीत वलगाव डेपोत एसटीला गाठले. सागर मैदानकर या घटनेविषयी पोलिसात तक्रार करणार होते. मात्र, अधिकाऱ्यांच्या विनंतीवरून त्यांनी तक्रार केली नाही. त्या एसटी चालकास डेपोच्या स्कॉडने शोकॉज नोटीस देऊन कारवाई केली.वलगावातील या घटनेविषयी माहिती नाही. चौकशी करून नेमके काय घडले ते तपासून पाहू.- श्रीकांत गभणे,विभागीय वाहतूक नियंत्रकएसटीच्या अधिकाऱ्यांचा स्कॉड व मी मागेच होते. आम्ही एसटीला वलगाव डेपोत गाठून चालकास जाब विचारला. चालकास 'शो कॉज' बजावली.- सागर मैदानकर, हॉनरली अ‍ॅनिमल वेलफेअर आॅफीसर