चाकूने भोसकून जीवे मारण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 00:59 IST2019-08-12T00:58:34+5:302019-08-12T00:59:04+5:30
जुन्या वैमनस्यातून चार ते पाच तरुणांनी एका इसमाला चाकूने भोसकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. चाकूचे वार पोटावर बसल्याने जखमी इसमाचे आतील आतडेसुद्धा बाहेर पडले आहेत. उमेश भैय्यालाल कोठारे (४९,रा. लक्ष्मीनगर) असे गंभीर जखमीचे इसमाचे नाव आहे. या हल्ल्यात जखमीच्या पत्नी माधुरी कोठारेसुद्धा जखमी झाल्या.

चाकूने भोसकून जीवे मारण्याचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जुन्या वैमनस्यातून चार ते पाच तरुणांनी एका इसमाला चाकूने भोसकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. चाकूचे वार पोटावर बसल्याने जखमी इसमाचे आतील आतडेसुद्धा बाहेर पडले आहेत. उमेश भैय्यालाल कोठारे (४९,रा. लक्ष्मीनगर) असे गंभीर जखमीचे इसमाचे नाव आहे. या हल्ल्यात जखमीच्या पत्नी माधुरी कोठारेसुद्धा जखमी झाल्या. ही धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी लक्ष्मीनगरात घडली.
कोठारे कुटुंबातील एका सदस्यावर काही तरुणांनी पूर्वी चाकूहल्ला केला होता. त्या प्रकरणात पोलीस तक्रारीनंतर काही तरुणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. या गुन्ह्यात आपसी समझोता करून प्रकरण निपटून टाका, असे त्या तरुण उमेश यांना म्हणत होते. मात्र, हल्लेखोर तरुणांना हे प्रकरण मिटवायचे नव्हते. त्यामुळे ते तरुण उमेशवर दबाव टाकत होते. रविवारी दुपारी उमेश कोठारे यांच्याकडे पाहुणे मंडळी होती. त्यांची पत्नी माधुरी पाहुण्यांना आॅटोपर्यंत सोडण्यास गेल्या.
दरम्यान निकू कचरेसह त्याचे चार साथीदार कोठारे यांच्या घरात शिरले आणि त्यांनी उमेशवर थेट चाकू व काठीने हल्ला चढविल्याचे त्यांच्या पत्नी माधुरीने पोलिसांना सांगितले. या हल्ल्यात उमेश गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे जखमीच्या नातेवाईकांनी प्रचंड रोष व्यक्त केला. गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सायंकाळी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.