शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
2
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
3
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
4
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
5
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
6
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
7
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
8
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
9
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
10
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
11
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
12
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
13
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
14
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
15
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
16
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
17
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
18
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
19
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
20
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...

दारुच्या अड्ड्यावर धाड टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जीवघेणा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 17:19 IST

दोघेही साध्या वेशात दुचाकीने मांजरखेड शिवाराजवळील पडीक जागेवर गावठी दारू तपासणीकरिता गेले होते.

चांदूर रेल्वे (अमरावती) : तालुक्यातील मांजरखेड (कसबा) येथील गावठी दारू अड्ड्यावर धाड टाकण्यास गेलेल्या चांदूर रेल्वे पोलिसांवर कुºहाडीने जीवघेणा हल्ला चढविण्यात आला. यामध्ये एका पोलीस कर्मचाºयाचा जागीच मृत्यू झाला, तर एक अत्यवस्थ आहे. ही घटना रविवारी सकाळी मजूर शेतात जात असताना उघडकीस आली.सूत्रांच्या माहितीनुसार, चांदूर रेल्वे पोलीस शिपाई सतीश मडावी (बक्कल नं.१५८९) असे मृताचे व एएसआय शामराव जाधव (बक्कल नं. १२२२) असे जखमीचे नाव आहे. दोघेही साध्या वेशात दुचाकीने मांजरखेड शिवाराजवळील पडीक जागेवर गावठी दारू तपासणीकरिता गेले होते. दरम्यान, गावठी दारूचा व्यवसाय करणाºयांनी दोघांवर कुºहाडीने प्राणघातक हल्ला चढविला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. आरोपींनी मडावी यांच्या डोके दगडाने ठेचल्याने ते रक्तबंबाळ अवस्थेत पडून होते. त्याच वाटेवरून सकाळी काही मजूर कामावर जात असताना त्यांना दोन पोलीस जखमी अवस्थेत दिसले. याची माहिती त्यांनी गावातील पोलीस पाटील व सरपंचांना दिली. त्यांनी सदर माहिती चांदूर रेल्वे ठाण्यात दिली. चांदूररेल्वेचे ठाणेदार ब्रम्हा शेळके यांच्या नेतृत्वात पोलीस पथक मांजरखेड येथील घटनास्थळी पोहचले. पोलिसानी सतीश मडीवी व शामराव जाधव यांना येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले. जखमी शामराव जाधव यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.तेथून जाधव यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेचे गांभीर्य बघता पोलिसांनी अतिरिक्त कुमक बोलावून आरोपींचा शोध सुरू केला. या प्रकरणात पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. पोलीस छावणीचे स्वरूपघटनेचे गांभीर्य बघता चांदूर रेल्वे ठाण्यात अतिरिक्त कुमक बोलावण्यात आली. पोलीस ठाण्यात जवळपास सात ते आठ गाड्या, हजारांवर पोलीस तैनात, दंगल नियंत्रण पथक, दरम्यान नागरिकांना पोलीस ठाण्यात येण्यास मज्जाव केला गेला.  

एसपी पोहचले चांदूर ठाण्यातघटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक एम.एस. मकानदार यांनी चांदूर रेल्वे पोलीस ठाणे गाठले. घटनेची माहिती ठाणेदाराकडून जाणून घेतली. घटनास्थळी भेट देऊन स्थितीचा आढावा घेतला. तणावाची स्थिती निर्माण होऊ नये, यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. 

दोन पोलीस कर्मचारी गावठी दारू अड्ड्यावर धाड टाकण्यासाठी गेले असता त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला व एक कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. संशयितांची चौकशी सुरु असून लवकरच आरोपीला अटक करू. एम.एस.मकानदार, अपर पोलीस अधीक्षक 

 

टॅग्स :PoliceपोलिसAmravatiअमरावती