शालेय विद्यार्थिनीची छेड, शिक्षकाविरुद्ध पोक्सो, अ‍ॅट्रॉसिटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 06:00 IST2020-02-29T06:00:00+5:302020-02-29T06:00:57+5:30

पोलीस अधीक्षकांच्या पुढाकाराने ग्रामीण भागात तक्रारपेट्या लावण्यात आल्या आहेत. त्या तक्रारपेटीतून निघालेल्या तक्रारीची दखल घेत हा गुन्हा नोंदविण्यात आला. ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या अखत्यारीतील ३१ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत तक्रारपेट्या लावण्यात आल्या आहेत. एका गावातील विद्यार्थिनीने काही दिवसांपूर्वी तक्रारपेटीमध्ये तिच्या शिक्षकाविरुद्ध तक्रार टाकली.

Atrocity Against Teacher | शालेय विद्यार्थिनीची छेड, शिक्षकाविरुद्ध पोक्सो, अ‍ॅट्रॉसिटी

शालेय विद्यार्थिनीची छेड, शिक्षकाविरुद्ध पोक्सो, अ‍ॅट्रॉसिटी

ठळक मुद्देतक्रारपेटीतील तक्रारीची दखल : आरोपीस अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शालेय विद्यार्थिनीची छेडखानी केल्याप्रकरणी एका शिक्षकाविरुद्ध विनयभंग, पोक्सो व अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारपेटीच्या माध्यमातून हे प्रकरण उजेडात आले.
पोलीस अधीक्षकांच्या पुढाकाराने ग्रामीण भागात तक्रारपेट्या लावण्यात आल्या आहेत. त्या तक्रारपेटीतून निघालेल्या तक्रारीची दखल घेत हा गुन्हा नोंदविण्यात आला. ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या अखत्यारीतील ३१ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत तक्रारपेट्या लावण्यात आल्या आहेत. एका गावातील विद्यार्थिनीने काही दिवसांपूर्वी तक्रारपेटीमध्ये तिच्या शिक्षकाविरुद्ध तक्रार टाकली. शाळेतील तो शिक्षक चुकीच्या पद्धतीने शारीरिक स्पर्श करतो. विरोध केल्यास मारहाणही करतो, अशी ती तक्रार होती.
तक्रारपेटीतील ती तक्रार पोलीस अधीक्षकांपर्यंत तातडीने पोहचविण्यात आली. पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. यांनी तात्काळ दखल घेत महिला पोलीस अधिकाऱ्यांचे पथक संबंधित गावात पाठविले. त्यांनी पीडिताचा शोध घेतला. तक्रारीची खातरजमा केली. याप्रकरणी आरोपी शिक्षकाचा शोध घेण्यात आला. गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. गुन्ह्याचा तपास एसडीपीओंकडे सोपविण्यात आला.

कुणावरही अन्याय, अत्याचार झाल्यास, त्यांनी तक्रारपेटीमध्ये आपली तक्रार दाखल करावी. योग्य शहानिशा करून संबंधितांविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- हरिबालाजी एन.
पोलीस अधीक्षक, अमरावती

Web Title: Atrocity Against Teacher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.