शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

फिनले मिलच्या सहायक व्यवस्थापकाला अटक; महिलेशी असभ्य वर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 14:24 IST

Amravati news परतवाडा येथील फिनले मिलमध्ये कार्यरत महिलेसोबत पाच वर्षांपासून असभ्य वर्तन करण्याच्या आरोपात अचलपूर पोलिसांनी तेथील सहायक व्यवस्थापकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करून बुधवारी मध्यरात्री अटक करण्यात आली.

ठळक मुद्देअपमानास्पद वागणूक

लोकमत न्यूज नेटवर्क 

अमरावती: परतवाडा येथील फिनले मिलमध्ये कार्यरत महिलेसोबत पाच वर्षांपासून असभ्य वर्तन करण्याच्या आरोपात अचलपूर पोलिसांनी तेथील सहायक व्यवस्थापकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करून बुधवारी मध्यरात्री अटक करण्यात आली.

             नरेंद्र कुमार संतराज शर्मा (३७, रा. गंगसरी, रायबरेली, उत्तर प्रदेश, ह.मु. देवमाळी, परतवाडा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो फिनले मिलमध्ये सहायक व्यवस्थापक (स्पिनिंग विभाग) या पदावर कार्यरत आहे. संबंधित महिलेच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध भादंविच्या ३५४ अ, ३५४ डी अन्वये अचलपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून बुधवारी मध्यरात्री अटक केली आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दखल नाही

संबंधित आरोपीकडून होणाऱ्या असभ्य व अश्लील हावभावासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपण सांगितले. मात्र, त्यांनी कुठलीही दखल घेतली नसल्याचे फिर्यादी महिलेने तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे घटनेचे गांभीर्य पाहता, फिनले मिलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी होणे गरजेचे ठरत आहे. सदर घटनेचा तपास ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनात महिला सहायक पोलीस निरीक्षक स्नेहल आढे व कर्मचारी करीत आहेत.

पूर्वी वादग्रस्त ठरली होती मिल

फिनले मिलमध्ये कार्यरत महिला कर्मचाऱ्यांसोबत अश्लील व असभ्य वर्तन होत असल्याच्या तक्रारी दहा वर्षांपूर्वी झाल्या होत्या. त्यानंतर महिला सदस्यांकडून चौकशीअंती दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा हे प्रकरण उघडकीस आल्याने मिल वादग्रस्त ठरली आहे.

दीपाली चव्हाण प्रकरणानंतर अलर्ट

हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या मानसिक त्रासामुळे त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्यानंतर महाराष्ट्रभर याचे पडसाद उमटले. त्या अनुषंगाने अचलपूरच्या या घटनेला अधिक महत्त्व आले आहे.

टॅग्स :Molestationविनयभंग