शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

सहायक जिल्हाधिकारी, तहसीलदार, बीडीओ रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2021 5:00 AM

चिखलदरा  तालुक्यातील काटकुंभ येथे कोरोनाग्रस्त आढळून आल्याने  पाच दिवसांसाठी कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे.  त्यामुळे संबंधित परिसराचा आढावा सहायक जिल्हाधिकारी तथा धारणीच्या उपविभागीय अधिकारी मिताली सेठी, तहसीलदार  माया माने, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ तसेच प्रशासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन घेतला.

ठळक मुद्देहॉटस्पॉट काटकुंभमध्येे सक्त ताकिद, नियम न पाळणाऱ्यांविरुद्ध गुन्हे

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ येथे बुधवारी सकाळी ११ वाजता सहायक जिल्हाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी आढावा घेतला. रस्त्यावर फिरणाऱ्या व कोरोना नियमाचे पालन न करणाऱ्या नागरिकांविरुद्ध तडक गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिले. चिखलदरा  तालुक्यातील काटकुंभ येथे कोरोनाग्रस्त आढळून आल्याने  पाच दिवसांसाठी कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे.  त्यामुळे संबंधित परिसराचा आढावा सहायक जिल्हाधिकारी तथा धारणीच्या उपविभागीय अधिकारी मिताली सेठी, तहसीलदार  माया माने, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ तसेच प्रशासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन घेतला. यावेळी उपस्थित वैद्यकीय अधिकारी आदित्य पाटील, ग्रामपंचायत सचिव, संबंधितांना कोरोना नियमाचे कडक पालन करण्याचे आदेश दिले. रस्त्याने विनामास्क फिरणाऱ्यांना त्यांनी तंबी दिली. पॉझिटिव्ह असलेला रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहे किंवा नाही, याची प्रत्यक्ष पाहणी या अधिकाऱ्यांनी केली. बाहेर फिरताना दिसल्यास गुन्हे दाखल करून कोविड सेंटरमध्ये भरती करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले.

चुरणी परिसराचा घेतला आढावा चिखलदरा पर्यटनस्थळ व  तालुक्यातील काटकुंभ आणि चुरणी हे तीन ठिकाण हॉटस्पॉट ठरले आहेत. तालुक्यात पहिल्यांदा ७३ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असल्याने प्रशासनाने परिसरातील गावांना भेटी दिल्या. उपस्थित ग्रामपंचायत पदाधिकारी व आदिवासींना सहकार्य करण्याचे व कोरोना नियमाचे पालन करण्याचे आवाहन केले

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या