असाईनमेंट बडनेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:09 IST2021-07-19T04:09:49+5:302021-07-19T04:09:49+5:30
श्यामकांत सहस्रभोजने - बडनेरा : पूर्वापार काळापासून सुरू असलेली आखाडी एकादशीची प्रथा आजही तेवढ्याच उत्साहाने जोपासली जात आहे. या ...

असाईनमेंट बडनेरा
श्यामकांत सहस्रभोजने - बडनेरा : पूर्वापार काळापासून सुरू असलेली आखाडी एकादशीची प्रथा आजही तेवढ्याच उत्साहाने जोपासली जात आहे. या दिवशी नवविवाहितांना माहेरी आणले जाते. मुलींनादेखील माहेरी जाण्याची प्रचंड ओढ असते. मात्र, कोरोनामुळे मागील बऱ्याच नवविवाहितांना जाता आले नाही. यामुळे त्यांच्या आनंदावर विरजण पडले. शासनाने ठरवून दिलेले नियम पाळणे तेवढेच महत्त्वाचे आहे, अशा प्रतिक्रियादेखील उमटल्या आहेत.
ज्या मुलींचे दूर अंतरावर विवाह झाले, अशा बहुतांश नवविवाहितांना कोरोना महामारीमुळे गतवर्षी आषाढीला माहेरी जाताच आले नाही. तेव्हा कडक निर्बंध होते. जोखीमही घेण्यास कुणी तयार नव्हता. यंदा नियमांत बरीच शिथिलता आली आहे. वाहतूकही सुरू असल्याने यावर्षी तरी आषाढीला माहेरी जाता येईल, अशी ओढ बऱ्याच नवविवाहिता बाळगून आहेत. आईदेखील मुलीच्या भेटीची वाट पाहत आहेत. आषाढ महिन्यात प्रत्येक नवविवाहिता माहेरी जात असते. फार आधीपासून ही प्रथा सुरू आहे. आषाढीला मुलगी घरी आली की आनंदाचे वातावरण असते. बऱ्याच जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग अद्यापही कायम आहे. त्यामुळेच तब्बल दुसऱ्या वर्षीदेखील नवविवाहितांना माहेरी जाता येत नसल्याच्या स्थितीमुळे आनंदावर विरजण पडल्याचे दिसून येत आहे. कमी अंतरावर असणाऱ्या नवविवाहिता यंदा मात्र आखाडीला येत आहे.
----------------------
प्रतिक्रिया-
* आहे तिथेच आखाडी करावी लागली
माझे माहेर अमरावती आहे तसेच सासर बडनेरा माझ्या नवऱ्याची नोकरी वणी येथे असल्याने आम्ही तिथेच राहतो मागील वर्षी कोरोणामुळे आम्हाला आखाडीसाठी माहेरी जाता आले नाही आहे तिथेच आखाडी केली कोरोणाचे नियम पाळणे देखील महत्त्वाचे होते.
- स्नेहल अभिजित साऊरकर
* आखाडी सासरीच.......
माझे लग्न याच उन्हाळ्यात झाले माझे सासर इटारसी आहे माहेर बडनेरा आहे वनवे यांची मुलगी आहे अजूनही बऱ्याच भागात कोरोनाचा प्रकोप असल्याने तसेच शासनाचे नियम पाळण्यासाठी मी आखाडी सासरीच साजरी करणार आहे.
- श्रुतुजा राहुल राकडे
* मागील वर्षी मुलीला येता आले नाही....
माझ्या मुलीचे सासर खामगाव आहे मागील वर्षी कोरोना संसर्गाचा प्रकोप प्रचंड होता सर्वच प्रकारे शासनाकडून निर्बंध होते प्रवास करणे धोक्याचे असल्यामुळे माझ्या मुलीने आखाडी सासरीच साजरी केली हा सण सासर, माहेरच्यांसाठी आनंदाचा असतो.
सुनीता सुभाष ओलोकार
* कोरोनामुळे आखाडी सणावर पडले विरजण
गेल्या दीड वर्षांपासून कोरोना संसर्गाचा प्रकोप सुरूच आहे. अजूनही पूर्णतः हा आजार संपलेला नाही. नवविवाहितेसाठी आखाडी सण अत्यंत आनंदाचा असतो. मागील वर्षी रेल्वे, बसेस, खासगी वाहनांच्या प्रवासावर कठोर निर्बंध होते. त्यामुळे या सणावर विरजण पडले होते.
- रंजना अरुण साकोरे.
-------------------------
* कोरोना काळात विवाहांची नोंद*
2020-
2021-
---------------------------