शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे पोलिसावर प्राणघातक हल्ला

By admin | Updated: April 6, 2017 00:12 IST

मटन खरेदी करताना उद्भवलेल्या वादातून एका रेल्वे पोलीस शिपायावर सत्तुरने प्राणघातक हल्ला करण्यात आला.

कठोरा नाक्यावरील घटना : मटन खरेदी करताना वादअमरावती : मटन खरेदी करताना उद्भवलेल्या वादातून एका रेल्वे पोलीस शिपायावर सत्तुरने प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास कठोरा नाक्यावर घडली. नीलेश सुधाकर कराळे (२१,रा.पवननगर, बडनेरा) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी संजय दशरथ मदनेकर (४०,रा.प्रवीणनगर) याला ताब्यात घेतले असून यातील मुख्य आरोपी हरिश अशोक लोणारे (२७,रा. बेलपुरा) याचा शोध पोलीस घेत आहेत. बडनेरा जीआरपीमध्ये कार्यरत नीलेश कराळे (ब.नं.१०६३) हे बुधवारी त्यांचे महेंद्र कॉलनी येथील जावई पांडुरंग नांदुरकर यांच्याकडे गेले होते. नीलेश व पांडुरंग कठोरा नाक्यावर मटन खरेदीकरिता मदनेकर यांच्या मटनविक्री दुकानावर गेले. नीलेश यांना मटन पसंत आले नाही. त्यामुळे ते खरेदी न करता तेथून दुसऱ्या दुकानाकडे निघाले. मात्र, दरम्यान आरोपींनी मटन खरेदी न केल्याच्या कारणांवरून नीलेश यांच्याशी वाद केला. त्यानंतर आरोपी हरिश लोणारे याने नीलेशवर सत्तुरने प्राणघातक हल्ला केला. नीलेश यांच्या पायावर चाकुचे वार झाल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांनी तत्काळ गाडगेनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपींविरूद्ध तक्रार नोंदविली. पोलिसांनी नीलेश यांना इर्विन रूग्णालयात नेऊन उपचार केले. तत्पूर्वी पोलिसांनी संजय मदनेकर यांना ताब्यात घेतले होते. गुन्हा दाखल करण्याची पुढील प्रक्रिया सुरु होती.