गव्हाचे दान मागितले अन् यजमानाच्या मुलीचा केला लैंगिक छळ!

By प्रदीप भाकरे | Updated: August 25, 2023 15:52 IST2023-08-25T15:52:12+5:302023-08-25T15:52:27+5:30

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील घटना : आरोपी अटक

Asked for wheat donation and sexually harassed the host's daughter! | गव्हाचे दान मागितले अन् यजमानाच्या मुलीचा केला लैंगिक छळ!

गव्हाचे दान मागितले अन् यजमानाच्या मुलीचा केला लैंगिक छळ!

अमरावती : गव्हाचे दान मागणाऱ्या आरोपी युवकाने यजमानाच्या घरातील अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याची धक्कादायक घटना नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील एका गावात २३ ऑगस्ट रोजीदरम्यान घडली. याप्रकरणी नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी पीडिताच्या आईच्या तक्रारीवरून आरोपी राजेश भाऊराव मांडोकर (२२, रा. हिवरा मुरादे) याच्याविरुद्ध अतिप्रसंग व पॉक्सोअन्वये गुन्हा दाखल केला. २४ ऑगस्ट रोजी रात्री ७:५३ च्या सुमारास तो ‘एफआयआर’ नोंदविण्यात आला.

आरोपी राजेश मांडोकर हा २३ ऑगस्ट रोजी सकाळी पीडिताच्या गावात दान मागत फिरत होता. सकाळी ९:३० च्या सुमारास तो पीडित अल्पवयीन मुलीच्या घराजवळ आला. त्याने तिच्या घरी जाऊन गव्हाचे दान मागितले. तेव्हा तिने घरी कुणी नसल्याचे त्याला सांगितले. त्यावेळी आरोपीने तिचा छळ करण्याच्या हेतूने तिच्याशी लैंगिक जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पीडिता तेथून घाबरून पळून गेली.

दरम्यान, आरडाओरड झाल्याने गावकरीदेखील जमा झाले. काही प्रत्यक्षदर्शींनी त्याला बेदम चोप दिल्याची माहिती आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पीडिताच्या आईने नांदगाव खंडेश्वर पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती ठाणेदार विशाल पोळकर यांनी दिली.

Web Title: Asked for wheat donation and sexually harassed the host's daughter!