मादी मिळविण्याच्या झटापटीत काळवीट अडकले ‘इथे’...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 13:23 IST2020-07-18T13:22:23+5:302020-07-18T13:23:57+5:30
मादी मिळविण्याच्या प्रयत्नात उद्भवलेल्या दोन काळविटांच्या संघर्षात एक काळवीट चक्क चिखलात गाडले गेले. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन त्या काळविटाला चिखलातून बाहेर काढले.

मादी मिळविण्याच्या झटापटीत काळवीट अडकले ‘इथे’...
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : मादी मिळविण्याच्या प्रयत्नात उद्भवलेल्या दोन काळविटांच्या संघर्षात एक काळवीट चक्क चिखलात गाडले गेले. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन त्या काळविटाला चिखलातून बाहेर काढले.
परतवाडा-अमरावती रोडवरील तळणी फाटा शेतशिवारात १७ जुलै रोजी ही घटना घडली. चिखलात फसलेल्या काळविटाविषयीची शेतकऱ्यांनी परतवाडा वनविभागाला माहिती दिली. यात वनरक्षक प्रदीप बाळापुरे, नितीन अहिरराव, मंगेश राऊत यांनी त्या काळविटाला मदतीचा हात दिला. चिखलातून त्याला बाहेर काढले. वनविभागाच्या वाहनातून त्याला व्याघ्र प्रकल्पाच्या ट्रान्झीट ट्रिटमेंट सेंटरला दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्यास सलाईन लावत औषधोपचार सुरू केलेत. सध्या त्या काळविटाची प्रकृती धोक्याबाहेर आहे. सध्या हरणांचा समागमनाचा काळ आहे.